हिवाळा सुरु झाला की अनेकांच्या घरात खो-खोचा आवाज येतोच. शिवाय ताप, सर्दी आणि अंगदुखीचे रुग्णही सापडतातच. हवामान बदलामुळे या सगळ्या गोष्टी घडतात. यावर उपाय म्हणून आपण कधी घरगुती उपायांना फॉलो करतो, तर कधी डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार करतो. पण घरातील एक फळ खाऊनही आपण सर्दी-खोकल्यापासून सुटका मिळवू शकता.
पेरूमध्ये (Guava) जास्त प्रमाणात पौष्टीक घटक आढळतात, आणि याचे सेवन हिवाळ्यात जरूर करायला हवा. त्यात व्हिटॅमिन सी, ए, ई, फायबर, लोह, कॅल्शियम, मॅंगनीज असते (Health Benefits). ज्याचा फायदा आरोग्याला होतो. हिवाळ्यात पेरू खाण्याचा सल्ला तज्ज्ञही देतात. व्हिटॅमिन सी आणि फायबर समृद्ध पेरू खाल्ल्याने आरोग्य सुधारते आणि रोगांचा धोका कमी होतो(Roasted guava or amrood can cure cough).
मेदांता हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ कामिनी सिन्हा सांगतात, 'पेरूमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते. यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. शिवाय सर्दी-खोकल्यापासूनही सुटका मिळते. पेरूमध्ये काळे मीठ घालून खाल्ल्यास आणखीनच फायदा होतो. विशेष म्हणजे पेरूमध्ये ब्लड शुगरवर नियंत्रण ठेवणारे गुणधर्म आढळतात.'
विसरभोळेपणा वाढतोय का, नावं-गोष्टी लक्षात राहत नाहीत? ५ टिप्स-स्मरणशक्ती वाढेल कायमची
खोकला नको मग खा पेरू
पोषणतज्ज्ञ सांगतात, 'हवामान बदलामुळे ज्यांना सर्दी-खोकल्याचा त्रास होतो, त्यांनी आवश्यक पेरू खावे. यासाठी गॅसवर पेरू भाजून घ्या. भाजून घेतल्यानंतर पेरू मॅश करा. नंतर त्यात काळे मीठ मिक्स करा. नंतर हा मॅश केलेला पेरू खा. यामुळे सर्दी खोकल्यापासून आराम मिळेल.
५ मिनिटं अजून म्हणत गजर झाल्यावरही झोपून राहता? ३ टिप्स, पहाटे उठणं होईल एकदम सोपं
पेरू खाण्याचे इतर फायदे
पेरूमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने पोटाचे विकार दूर होता. शिवाय पेरू हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. पेरूमध्ये पोटॅशियम आणि सोडियम असते, जे उच्च रक्तदाबावर नियंत्रित ठेवण्यास मदत करते. शिवाय त्यातील गुणधर्मामुळे बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.