तूप हा अतिशय आरोग्यदायी पदार्थ. घरी तयार केलेलं साजूक तूप हे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असतं. त्यामुळे बऱ्याच जणी पोळ्या किंवा पराठे भाजताना त्यांना तूप लावतात आणि मग ते तव्यावर खमंग भाजतात. अनेक घरांमध्ये तर पुरणपोळीही अशाच पद्धतीने तव्यावर तूप लावून भाजली जाते. पण असं करणं खरंच आरोग्यदायी आहे का (how to cook food using ghee)? अशा पद्धतीने तूप लावलं तर तुपातल्या पौष्टिक घटकांचा लाभ शरीराला मिळतो का, याविषयीची ही खास माहिती पाहा... (roasting chapati, paratha by applying ghee on pan)
पोळी, पराठे, ब्रेड तूप लावून भाजताना, एखादा पदार्थ तुपात तळताना किंवा एखाद्या पदार्थ तुपात तयार करताना बहुसंख्य भारतीय लोक कोणती चूक करतात, याविषयीचा एक व्हिडिओ आहारतज्ज्ञांनी detoxdiaries_shreya या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.
डोक्यात सतत कोंडा होतो, चेहराही खराब झाला? १ आयुर्वेदिक उपाय- कोंडा कायमचा निघून जाईल
यामध्ये ते असं सांगतात की तुपाचा स्मोक पाॅईंट खूप जास्त असतो. पण जेव्हा आपण पराठ्यांना, पोळ्यांना त्या तव्यावर भाजताना तूप लावतो, तेव्हा बऱ्याचदा तूप तव्यावर टाकताच त्याची वाफ होऊ जाते. म्हणजेच तूप जळतं. असं स्मोक पाॅईंटपेक्षा जास्त तापमानावर गेलेल्या तुपामधले केमिकल घटक बदलले जातात आणि त्याच्यातली पौष्टिकता नष्ट होते. त्यामुळे मग तुम्ही पोळीला किंवा पराठ्यांना कितीही तूप लावलं तरी त्याचा फायदा तुमच्या शरीराला मिळत नाही.
याविषयी आहारतज्ज्ञ कनिका मल्होत्रा यांनी एक्स्प्रेस ग्रुपला दिलेल्या माहितीनुसार जेव्हा तुपाचा धूर होतो तेव्हा त्यातले पॉलीसॅच्युरेटेड आणि मोनोसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स अल्डेहाईड्स, हायड्रोकार्बन्स आणि हायड्रोपेरोक्साईड्ससारख्या फ्री रॅडिकल्समध्ये बदलले जातात.
जेवण झाल्यानंतर करा फक्त २ गोष्टी, वजन वाढणार नाही-पोटही सुटणार नाही, आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात...
हे सगळे घटक श्वसनक्रिया तसेच हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक असतात. त्यामुळे एकतर पराठे किंवा पोळी भाजून झाल्यावर त्याला तूप लावा किंवा मग तव्याचे तापमान मेंटेन ठेवून पराठ्यांना तूप लावा, जेणेकरून ते जळून जाणार नाही.