Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > तुम्हीही 'या' पोझिशनमध्ये झोपता? झोप राहील अपूर्ण- श्वास घेण्यात होईल त्रास; गाढ झोप हवी असेल तर..

तुम्हीही 'या' पोझिशनमध्ये झोपता? झोप राहील अपूर्ण- श्वास घेण्यात होईल त्रास; गाढ झोप हवी असेल तर..

Role of Sleeping Positions in Improving Sleep Quality : झोपण्याच्या 'या' चुकीच्या पद्धतीमुळे श्वास घेण्यात येऊ शकते अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2024 07:57 PM2024-10-10T19:57:41+5:302024-10-10T19:58:40+5:30

Role of Sleeping Positions in Improving Sleep Quality : झोपण्याच्या 'या' चुकीच्या पद्धतीमुळे श्वास घेण्यात येऊ शकते अडचण

Role of Sleeping Positions in Improving Sleep Quality | तुम्हीही 'या' पोझिशनमध्ये झोपता? झोप राहील अपूर्ण- श्वास घेण्यात होईल त्रास; गाढ झोप हवी असेल तर..

तुम्हीही 'या' पोझिशनमध्ये झोपता? झोप राहील अपूर्ण- श्वास घेण्यात होईल त्रास; गाढ झोप हवी असेल तर..

झोपण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे रात्री. दिवसभरात शरीर थकते, आणि हा थकवा दूर करण्यासाठी आपण रात्री झोपतो (Sleep Quality). शरीराला ८ तासांची झोप हवीच (Health Tips). ८ तास शरीराला विश्रांती  मिळाल्याने दिवसभराचा थकवा तर दूर होतोच (Sleep Cycle). शिवाय सकाळी ताजेतवाने वाटते. पण बऱ्याचदा सकाळी उठल्यानंतर अंग दुखते. किंवा रात्री खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचत नाही. अपचनामुळे रात्रीची झोपही पूर्ण होत नाही. असे का होते? याचा आपण कधी विचार केला आहे का?

झोपताना आपण कोणत्या पद्धतीने झोपत आहोत, पोझिशन देखील महत्वाची ठरते. कारण बहुतांश लोक चुकीच्या पद्धतीने झोपतात. ज्यामुळे चांगली झोप लागत नाही आणि शरीर तणावाखाली राहते. आरोग्य तज्ज्ञ आणि लेखक प्रशांत देसाई यांनी उत्तम झोपेसाठी बेस्ट पोझिशन याची माहिती दिली आहे. शिवाय झोपताना कोणत्या चुका टाळायला हव्या? पाहा(Role of Sleeping Positions in Improving Sleep Quality).

पाठीवर झोपणे चूक

तज्ज्ञांनी झोपेच्या समस्येवर त्रस्त लोकांवर संशोधन केले असता, झोपेच्या चुकीच्या स्थितीमुळे झोपमोड आणि अंगदुखीचे कारण बनते. जे लोक पाठीवर झोपतात, त्यांना गाढ झोप येत नाही.ज्यामुळे मध्यरात्री अचानक जाग येते आणि झोपमोड होते.

भाजीसोबत फुकट मिळणारी 'ही' पानं वेट लॉससाठी बेस्ट; चमचाभर चटणी रोज खा; पोटाची चरबी झरकन घटेल

मोठ्याने घोरणे

जे लोक पाठीवर झोपतात, त्यांच्या जबडा आणि घशाच्या स्नायूंवर दबाव येतो. श्वासोच्छवासाच्या नलिकेत अडथळे येऊ शकतात. ज्यामुळे लोक तोंडाद्वारे श्वास घेतात आणि घोरतात. शिवाय स्लीप एपनियाचाही त्रास होतो.

उशी घेऊन झोपणे

या समस्येवर उत्तम उपाय म्हणजे उशी घेऊन झोपणे. उशीमुळे मानेला आणि शरीराला आधार मिळतो. शिवाय श्वासोच्छ्वासाची नळी उघडी राहते. ज्यामुळे झोप चांगली लागते.

भाजलेले की भिजवलेले? चणे नेमके कसे - केव्हा खाणे योग्य? वजन कमी करायचा फायदा हवा तर..

साईड पोझिशन बेस्ट

तज्ज्ञांच्या मते, साईड पोझिशनमध्ये झोपल्याने श्वासोच्छवासाच्या नलिकेत अडथळे येत नाही. ज्यामुळे घोरत नाही. त्यामुळे झोपताना नेहमी साईड पोझिशनमध्ये झोपावे.

Web Title: Role of Sleeping Positions in Improving Sleep Quality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.