Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > हिवाळ्यातही अपचनाचा त्रास? आंबट ढेकर - ॲसिडिटीने हैराण? २ चुका टाळा; तज्ज्ञ ऋजुता दिवेकर सांगतात..

हिवाळ्यातही अपचनाचा त्रास? आंबट ढेकर - ॲसिडिटीने हैराण? २ चुका टाळा; तज्ज्ञ ऋजुता दिवेकर सांगतात..

Rujuta Diwekar | Delayed lunch causing acidity, headache : ॲसिडिटीचा त्रास कमी करण्यासाठी घरगुती उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2024 06:02 PM2024-11-10T18:02:04+5:302024-11-10T18:06:25+5:30

Rujuta Diwekar | Delayed lunch causing acidity, headache : ॲसिडिटीचा त्रास कमी करण्यासाठी घरगुती उपाय

Rujuta Diwekar | Delayed lunch causing acidity, headache | हिवाळ्यातही अपचनाचा त्रास? आंबट ढेकर - ॲसिडिटीने हैराण? २ चुका टाळा; तज्ज्ञ ऋजुता दिवेकर सांगतात..

हिवाळ्यातही अपचनाचा त्रास? आंबट ढेकर - ॲसिडिटीने हैराण? २ चुका टाळा; तज्ज्ञ ऋजुता दिवेकर सांगतात..

दिवाळीनंतर ॲसिडिटीचा (Acidity) त्रास होणं कॉमन आहे. कारण दिवाळीत आपण दाबून फराळ (Diwali Faral) आणि मिठाई खातो. काहींना दिवाळीचा फराळ पचतो. तर काहींना पचत नाही (Acidity). ज्यामुळे खाल्लेलं व्यवस्थित पचत नाही. ज्यामुळे पोटदुखी, पोट फुगणे, पोटात गॅस यांसारख्या समस्या निर्माण होतात. ज्यामुळे आपल्याला दिवसभर अस्वस्थ वाटते. बऱ्याचदा रात्री उशिरा जेवणं, उशीर झोपणं, सकाळी उशिरा उठल्यावर वेळाने नाश्ता करणं, यामुळे पचनसंस्था बिघडते.

बऱ्याच वेळेस जेवल्यानंतर अपचन, आंबट ढेकर येणे आणि उलटी होणे असे अनेक त्रास लोकांना होतात. ही सर्व ॲसिडिटीची लक्षणे आहेत.  ॲसिडिटीचा त्रास कमी करण्यासाठी नक्की कोणते उपाय उपयुक्त ठरतील? दवाखान्यात न जाता, कोणते घरगुती उपाय मदत करतील? याची माहिती आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी दिले आहे(Rujuta Diwekar | Delayed lunch causing acidity, headache).

फराळ खाल्ले नी वजन वाढले? करा ५ सोप्या गोष्टी; पचनक्रिया होईल सुरळीत - वजन घटेल

ॲसिडिटीचा त्रास दूर करण्यासाठी घरगुती उपाय

जेवण वेळेवर करा


जेव्हा पोटातील गॅस्ट्रिक ग्लँड ही ॲसिडचे उत्पादन वाढवू लागते, त्या स्थितीला ॲसिडिटी असे म्हणतात. ही समस्या सहसा वेळेवर न जेवल्यानेही उद्भवते. आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आपलं खाणं सहसा उशिरा होतं. ज्यामुळे खाल्लेलं नीट पचत नाही. जेवल्यानंतर आपण लगेच झोपतो. ज्यामुळे पोटात जळजळ होणे आणि आंबट ढेकरचा त्रास होतो. त्यामुळे शक्यतो वेळेवर जेवण करण्याचा प्रयत्न करा.

झोप वेळेवर घ्या

वेळेवर झोप न घेतल्यानंही ॲसिडिटीचा त्रास होतो. काही लोक रात्रीचं तासंतास मोबाईल फोनवर वेळ घालवतात. ज्यामुळे झोपेचं चक्र बिघडतं आणि याचा फटका पचनसंस्थेला बसतो. त्यामुळे ८ तासांची वेळेवर झोप घेणे गरजेचं आहे. यासह जेवणानंतर लगेच झोपू नये. जेवण व झोप यात कमीत कमी ३ तासांचे अंतर ठेवावे.

पाण्यात कडीपत्ता घालताच होईल जादू; बॅड कोलेस्टेरॉल होईल कमी - हृदयही राहील निरोगी

- जर आपल्याला तरीही ॲसिडिटीचा त्रास जाणवत असेल तर, आपण ग्लासभर ताक घेऊ शकता. जेवणानंतर एक ग्लास ताक प्या. यामुळे पचनक्रियाला चालना मिळेल. यामध्ये निरोगी बॅक्टेरिया आणि लॅक्टिक ऍसिड असते. ज्याचा फायदा पचनसंस्थेला होतो. उत्तम पचनासाठी आपण त्यात हिंग देखील घालू शकता.  

Web Title: Rujuta Diwekar | Delayed lunch causing acidity, headache

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.