चहाला वेळ नाही, वेळेला चहा लागतो (Tea Drinking Tips). आपल्या भारतात चहा प्रेमींची कमी नाही. अनेकांची सकाळ चहानेच होते. तर काहींना सायंकाळी किंवा रात्री चहा प्यायला आवडते (Health Care). पण चहा पिण्याची देखील एक वेळ असते. दूध साखरेचा चहा रात्रीच्या वेळेत पीत असाल तर, गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. शिवाय स्ट्रेस देखील वाढू शकते. जर आपल्याला चहा पिण्याची सवय सोडायची असेल तर, हर्बल टी किंवा तुळशीचा चहा पिऊ शकता. शक्य तितके कॅफिनयुक्त चहा पिणे टाळा(Rules to drink tea: Best time, dos and don'ts).
यासंदर्भात, आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार सांगतात, '६४ टक्के भारतीय लोकांना चहा प्यायला आवडते. त्यापैकी ३० टक्के लोक सायंकाळचा चहा पितात. जे आरोग्यासाठी घातक ठरते. जर आपल्याला उत्तम झोप, लिव्हरला योग्य प्रकारे डिटॉक्स आणि जळजळ कमी करायची असेल तर, झोपण्याच्या १० तास आधी कॅफिनयुक्त पेय पिणे टाळा.'
कॅफिनयुक्त चहा पिण्याचे दुष्परिणाम?
स्ट्रेस
कॅफिनयुक्त चहा पिण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. मुख्य म्हणजे यामुळे स्ट्रेस वाढू शकते. रात्रीच्या वेळेस कॅफिनयुक्त पेय प्यायल्याने झोप खराब होऊ शकते. त्यामुळे शक्यतो झोपेच्या आधी कॅफिनयुक्त पिणे टाळावे. झोप पूर्ण न झाल्यामुळे चिडचिड आणि स्ट्रेस वाढू शकते.
२ बाळंतपणात वाढललेलं २३ किलो वजन कसं कमी केलं, नेहा धुपिया सांगते, आई झाल्यावर..
पचन समस्या
साखर आणि दुधाचा चहा प्यायल्याने पचनाच्या निगडीत समस्या वाढू शकतात. यामुळे अॅसिडिटी, बद्धकोष्ठता किंवा अपचन होऊ शकते. यासह गॅस्ट्रिकचा त्रास होऊ शकतो.
छातीत जळजळ
काही लोकांना चहा पिल्याने छातीत जळजळ होऊ शकते, विशेषतः रात्री. रात्री छातीत जळजळ होण्याच्या समस्येमुळे झोप खराब होऊ शकते. शिवाय रात्रभर अस्वस्थ वाटू शकते.
आजपासून रोज करा फक्त ३ गोष्टी, महिनाभरात थुलथुलीत पोट आणि कंबरेची साइज होईल कमी
उच्च रक्तदाब
जास्त प्रमाणात कॅफिनयुक्त पेय प्यायल्याने रक्तदाब वाढू शकते. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी त्यांच्या झोपेची विशेष काळजी घ्यायला हवी. त्यामुळे लोकांनी रात्रीच्या वेळेस कॅफिनयुक्त पेय पिणे टाळावे.