Join us   

अंघोळ कशी करावी? सद्गुरू जग्गी वासुदेव सांगतात अंघोळीची योग्य पद्धत-नकारात्मकता होईल दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 1:46 PM

Sadhguru Jaggi Vasudev Told The Right Way of Bathing (Anghol kashi kartat) : अंघोळ करताना बरेच लोक चुका करतात यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

अंघोळ करणं (Bathing) हा प्रत्येकाच्याच रोजच्या रुटीनचा एक भाग असतो. अंघोळ केल्यानंतर फ्रेश वाटतं आणि व्यक्ती टापटीप, फ्रेश  दिसते. (Anghol kashi karavi) सकाळी उठल्यानंतर अंघोळ करूनच कोणतेही काम करावे असं म्हणतात कारण यातून मनशांती आणि सकारात्मक उर्जा मिळते. (How to Shower According to Sadhguru Jaggi Vasudev) अंघोळ करण्याची योग्य पद्धत कोणती याबाबत खूप कमी लोकांना माहीत असते. (Sadhguru Jaggi Vasudev Told The Right Way of Bathing)

अंघोळ करताना बरेच लोक चुका करतात (Bathing Mistakes) यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी आपलं शरीर सुरक्षित आणि निरोगी ठेवण्यासाठी अंघोळ करण्याची योग्य पद्धत  सांगितली आहे. ज्यामुळे नकारात्मकता दूर राहते. यांनी आपल्या युट्यबू चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड केला आहे. (How to Shower and Bathe Properly)

१) दिवसातून कमीत कमी २ वेळा अंघोळ करा

प्रत्येक व्यक्तीने  दिवसातून कमीत कमी २ वेळा अंघोळ करायला हवी. जर तुम्ही जास्तवेळ गर्दीच्या ठिकाणी थांबत असाल तर दोनदा अंघोळ करण्याची सवय लावा. यामुळे शरीर आणि मन दोन्ही प्रसन्न राहील आणि योगशक्ती वाढेल.

थकल्यासारखं वाटतं, अशक्तपणा आलाय? व्हिटामीन B-12 साठी खा ८ पदार्थ, ताकद येईल भरपूर

२) पाण्यात मिसळा निलगिरीचे तेल

जर एखाद्या व्यक्तीला सर्दीचा त्रास होत असेल तर सुरूवातीच्या २ आठवड्यात अंघोळीच्या पाण्यात १ चमचा निलगिरीचे तेल घालून या पाण्याने अंघोळ करा. यामुळे सर्दीचा त्रास कमी होईल.

३) अंघोळ करण्याची योग्य पद्धत

पूर्वीच्या काळात अंघोळीसाठी कोणत्याही शॉवरचा वापर केला जात नव्हता अंघोळ करण्यासाठी पाण्यात उडी मारण्याची प्रथा होती. बदलत्या काळात अंघोळ करण्याची पद्धतही बदलली आहे अंघोळ करताना शरीरावर आधी पाणी घातल्याने शरीरातील हिट डोक्यापर्यंत पोहोचते. सगळ्यात आधी डोक्यावरून थंड पाणी घ्या ज्यामुळे शरीराची हिट डोक्यावर येणार नाही.

४) थंड पाण्याने अंघोळ

अंघोळीसाठी नेहमी अशा पाण्याचा वापर करावा ज्याचे तापमान रूम टेम्परेचरपेक्षा कमी आहे. असं केल्याने रक्त वाहिन्या आणि आजूबाजूची जागा उघडली जाते. गरम पाण्याने अंघोळ न केल्यास असे होत नाही. म्हणून नेहमी थंड पाण्याने अंघोळ करायला हवी. हिवाळ्याच्या दिवसांत तुम्ही कोमट पाण्याचा वापर करू शकतात.

टॅग्स : हेल्थ टिप्सलाइफस्टाइलफिटनेस टिप्स