हेल्दी राहण्यासाठी खाल्ल्या जाणाऱ्या प्रत्येक पदार्थाकडे लक्ष द्यायला हवं. पॅक फूड मधून प्लास्टिक शरीरात जाण्याचा धोका वाढलेला आहे. यामुळे कॅन्सर, डायबिटीससारखे आजार होऊ शकतात. सद्गुरू सांगतात की कॅन किंवा बॉटलमध्ये ठेवलेले कोणतेही पदार्थ खाणं टाळायला हवं. हे पदार्थ खाल्ल्यानं आजारांचा धोका उद्भवू शकतो. (Health Tips)
सद्गुरू सांगतात की कॅन किवा बॉटलमध्ये ठेवलेलं अन्न खाणं टाळायला हवं. सद्गुरू जग्गी वासूदेव सांगतात की तुम्ही कॅन किंवा बॉटलमधलं अन्न खाऊ शकता पण रोज रोज हे असं अन्न खाऊ नका यामुळे गंभीर आजारांचा धोका उद्भवू शकतो. कारण या वेगळे घटक शरीरात जातात. (Sadhguru Never Eat Canned Or Bottled Foods That Can Cause Cancer To 90 Percent People)
रिसर्चनुसार प्लास्टीकचा जास्त वापर कॅन्सरचं कारण ठरू शकतो. खासकरून प्लास्टीकच्या पॉलिथिनमध्ये ठेवलेले गरम पादार्थ खाल्ल्यानं किंवा प्यायल्यानं कॅन्सरचा धोका वाढतो. अनेक रिसर्चमधून हे दिसून आले आहे की बिस्फिनॉल ए (बीपीए) नावाचे केमिकल पेशींची संरचना बदलून कॅन्सरचा धोका वाढवतात.
प्लास्टीकपासून बनलेल्या खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये धोकादायक रसायनं असतात. अभ्यासानुसार ७६ संदिग्ध पदार्थ स्तन कॅन्सरसाठी कारणीभूत ठरणारे घटक दिसून आले. ज्यातील ६१ तत्व प्लास्टीकशी संबंधित होते. ज्यामुळे स्तनांच्या कॅन्सरचा धोका वाढतो.
डिलिव्हरीनंतर वजन कमी करण्यासठी यामी गौतम खायची हे लाडू; १ लाडू खा, मूल झाल्यानंतरही स्लिम दिसाल
९० टक्के लोकांना बीपीएचा धोका
पॅकेज्ड फूडमध्ये सोडीयमचे प्रमाण जास्त असते. जे हाय ब्लड प्रेशरचं मुख्य कारण मानलं जातं. ज्यामुळे हृदयाचे आजार उद्भवतात. कॅन किंवा बॉटल्समधल्या अन्नात फॅट्स जास्त प्रमाणात असते. जे सॅच्युरेडट फॅट असते जे खूपच घाणेरडे मानले जाते. यामुळे एलडीएल कोलेस्टेरॉल वाढते. जे नसांमध्ये जमा झाल्यामुळे हृदयाचे विकार वाढतात.
डायबिटीस
पॅकेज्ड फूड्स आणि ड्रिंक्समध्ये आर्टिफिशियल स्वीटनरर्स असतात. ज्यात साखर, मीठ वेगानं विरघळतं आणि ब्लड शुगर वाढते. दीर्घकाळ या पदार्थांचे सेवन केल्यानं डायबिटीसचा धोका वाढू शकतो.