सद्गुरू नेहमी लोकांच्या आरोग्याबाबत जागरूक राहतात, सदगुरू नेहमी पारंपारीक पद्धतीने लोकांना खाण्यापिण्याचा सल्ला देतात. आधुनिक भोजन नाकारून ते लोकांना खाण्यापिण्याच्या योग्य पद्धती शिकवतात. सद्गुरूंनी एका व्हिडिओमध्ये सांगितले की आपले शरीर वर्तमान स्थितीत कसे आहे ते पाहून जेवणाची निवड करायला हवी. (Sadhguru Tells Most Powerful Source Of Protine Eat Every Morning Kulthi And Peanuts)
ज्यामुळे शरीर संस्था चांगली चालेल आणि वरपर्यंत पोहोचेल. म्हणून दिवसाची सुरूवात हेल्दी पदार्थ खाऊन करायला हवी. सद्गगुरू सांगतात की सकाळची सुरूवात नेहमी अंकुरीत कुलिथाची डाळ आणि काही मोड आलेली कडधान्य खाऊन करावी. यामुळे तुमचं संपूर्ण शरीर चांगले राहते. भिजवलेले मुग आणि शेंगदाणे हे २ पदार्थ प्रोटीनचा महासागर आहेत. (Sadhguru Tells Most Powerful Source Of Protine)
सद्गगुरूंची वेबसाईट ईशा सद्गुरूच्या रिपोर्टनुसार कुथिळाच्या डाळीचे सेवन केल्यानं डायबिटीज, हार्ट डिसीज, किडनी स्टोन, अस्थमा, लठ्ठपणा, सर्दी आणि इतर आजारांपासून फायदा मिळतो. कुळिथाच्या डाळीत प्रोटीन्स व्यतिरिक्त कॅल्शियम आणि इतर पोषक तत्व असतात. यात अनेक प्रकारचे एंटीऑक्सिडेंट्स असतात. सद्गुरूंच्यामते कुळीथाची डाळ या पृथ्वीवर प्रोटीनचा सगळ्यात मोठा स्त्रोत आहे (Ref). कुथिळाची डाळ ही बरीच शक्तीशाली असते. म्हणूनच ही डाळ घोड्याला खाऊ घातली जाते. कुथिळाच्या डाळीला हॉर्स ग्राम म्हणतात. पण व्यक्तीसाठी ही डाळ खूपच किमती आहे. कुळिथाला तमिळमध्ये कोलू असं म्हणतात.तेलुगूमध्ये उलावालू आणि कन्नडमध्ये हुरूले असं म्हणलं जातं. यात प्रोटीन्स भरपूर असतात.
कुथिळाची डाळ खाण्याची योग्य पद्धत (Right Way to Consume Kulith Dal/ Horse Gram)
सदगुरू सांगतात की कुळीथाची डाळ जेव्हा अंकुरित केली जाते तेव्हा अधिक शक्तीशाली बनते. हे खाण्याआधी मोड आणावेत. कुळीथाच्या डाळीला एक वाटी पाण्यात ठेवा. ६ ते ८ तास तसंच सोडून द्या. त्यानंतर एक पांढरं कापड घ्या आणि त्यात बांधून ठेवा. २ ते ३ दिवसानंतर मोड आलेली असतील. यामुळे पचनक्रियाही चांगली राहते.
मोड आलेले शेंगदाणे (Sprouted Peanuts Benefits)
मोड आलेले शेंगदाणे प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहेत. सद्गुरू सांगतात की मोड आलेले शेंगदाणे किंवा केळीचे सेवन करा. याचे अनेक फायदे आहेत. शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. यासाठी ६ ते ७ तासांसाठी भिजवून ठेवा त्यांतर याचे सेवन करा. शेंगदाण्यांचे सेवन केल्यानं शरीरातील पित्त निघून जाते. सद्गुरू सांगतात की माणसाने माणसासारखं जेवण करायला हवं. शरीर आणि वातावरणाच्या हिशोबानं खावं.