Join us   

सद्गुरु जग्गी वासुदेव सांगतात 'या' पद्धतीने बदाम खाल तर मिळेल पोषण; अन्यथा कर्करोग आणि..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2024 3:26 PM

Sadhguru - The Right Way to Consume Almonds : बदाम कोणत्या पद्धतीने खाल्ल्यास शरीराला मिळेल जास्त पोषण?

बदाम (Badam) खाण्याचे अनेक फायदे आहेत (Almonds). बदामामध्ये बदाम खाल्ल्याने प्रथिने, फायबर, हेल्दी फॅट, व्हिटॅमिन ई, मँगनीज, मॅग्नेशियम यांसारखे शक्तिशाली पोषक घटक मिळतात (Health Tips). मेंदू - स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यासाठी बदाम अवश्य खाल्ले जाते. बदाम आपण दोन प्रकारे खातो. एक म्हणजे कच्चे नाहीतर भिजवून खातो. जर शरीराला बदमातून योग्य पोषण मिळावे असे वाटत असेल तर, बदाम योग्य प्रकारे खायला हवे. अन्यथा कर्करोग होण्याचा धोका वाढतो.

यासंदर्भात, सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी कर्ली टेल्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, बदाम योग्य पद्धतीने खावेत. त्यात कार्सिनोजेनिक पदार्थ असतात, जे सक्रिय होऊन कर्करोग होऊ शकतो. या माहितीच्या अभावामुळे कर्करोगाचा मोठा धोका संभवतो. त्यामुळे बदाम खाण्याची योग्य पद्धत असणे गरजेचं आहे(Sadhguru - The Right Way to Consume Almonds).

सद्गुरूंनी सांगितले बदामामुळे कर्करोग कसा होतो?

{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/448177317651643/}}}}

बदामाच्या आत कार्सिनोजेनिक रसायने असतात, जी बदाम भिजवताच बाहेर पडतात. एनसीबीआयच्या अहवालानुसार, 'बदामासारख्या नटांमध्ये AFLATOXIN B1 असते ज्याला लिव्हर कार्सिनोजेन म्हणतात. याचा संबंध यकृताच्या कर्करोगाशी असल्याचे दिसून येते. हा धोका तेव्हाच वाढतो, जेव्हा आपण कच्चे बदाम जास्त प्रमाणात खातो.

तेलकट पदार्थ खाणे बंद करूनही वजन घटेना? ' हे ' ४ तेल स्वयंपाकासाठी वापरा, वजन वाढणारच नाही

भिजवलेले बदाम खा

भिजवलेले बदाम पचायला हलके असतात. सद्गुरूंच्या मते, साल काढून बदाम खाल्ल्याने कार्सिनोजेनिक संयुगे नष्ट होतात. यासाठी आदल्या रात्री काही बदाम पाण्यात भिजत ठेवा. सकाळी पाणी काढून सोलून घ्या. आणि खा.

वाढते स्मरणशक्ती

बदामामध्ये व्हिटॅमिन ई आणि ओमेगा फॅटी ऍसिडचे प्रमाण चांगले असते. हे दोन्ही पोषक तत्व मेंदूच्या पेशींचे कार्य वाढवण्याचे काम करतात.

जान्हवी कपूरसारखा फिटनेस आणि फिगर हवी? कॉफीमध्ये १ सोनेरी गोष्ट मिसळून रोज प्या; मेंदूलाही मिळेल चालना

अशक्तपणा होतो दूर

उर्जेच्या कमतरतेमुळे थकवा जाणवतो. यासाठी आपण बदाम खाऊ बदामामध्ये नैसर्गिक साखर, पोषण आणि फायबर असते. या सर्व गोष्टी शरीराला पुरेशा प्रमाणात ग्लुकोज पुरवतात. जे रक्तातील साखरेला हानी न पोहोचवता ऊर्जा वाढवते.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य