झोपेत तुम्ही अनेक नकारात्मक किंवा सकारात्मक गोष्टी वाढवू शकता. अलार्म लावून सकाळी उठणं हा जीवन जगण्याचा चांगला मार्ग नाही. अनेकजण सकाळी उठल्यानंतर कारण नसताना दुखी होतात. म्हणजेच तुम्ही रात्री अतिविचार केला असणार. (Sadhguru's 10 Tips To Sleep Well) यामुळे मानसिक नाही तर शारीरिक आरोग्यावरही परिणाम होतो. जर तुमच्याही बाबतीत असं होत असेल तर झोपण्याआधी तुम्ही काही गोष्टी करायला हव्यात. जेणेकरून चांगली झोप येईल. (How to Sleep Well Tips From Sadhguru Jaggi Vasudev)
१) मांस किंवा फॅट्सयुक्त जेवण खात असाल तर झोपण्याच्या २ ते ३ तास आधी खा. जेणेकरून त्याचे पचन चांगले होईल. झोपण्याच्या आधी पाणी पिऊन नंतर झोपायला जा. ज्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल आणि झोप पूर्ण होईल.
२) झोपण्याच्या आधी अंघोळ करा. झोपण्याआधी अंघोळ केल्याने शरीर निरोगी राहते. रात्री कोमट पाण्याने अंघोळ करा. अंघोळीनंतर १० ते २० मिनिटं किंवा अर्ध्या तासाने झोपलात तरी चालेल. यामुळे चांगली झोप येईल. अंघोळ केल्याने फक्त त्वचेची स्वच्छता नाही होत तर मनही चांगले राहते.
३) झोपण्याआधी जैविक तेलाचा दिवा लावा. ऑलिव्ह ऑईल, लिनसिड ऑईल अशा कोणत्याही प्रकारचा दिवा लावू शकता. ज्या ठिकाणी झोपता त्या ठिकाणी एक छोटा दिवा लावा. रात्री झोपताना अंथरूणात बसून योगाभ्यास किंवा ध्यान करा.
४) झोपताना डोकं उत्तर दिशेला डोकं ठेवू नका. ज्यामुळे रक्तप्रवाह चांगला होतो आणि रक्त हळूहळू डोक्याच्या दिशेला जाते. मेंदूला रक्त पुरवठा व्यवस्थित झाला नाही तर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
५) तुम्ही नश्वर आहात हे लक्षात ठेवा. झोपण्याच्या आधी अंथरूणात बसून विचार करा. तुम्ही आज जे केलं ते सार्थक आहे का, तुम्ही काही चुकीचे तर नाही करत आहात ना. याचा विचार करा. मी २४ तासात जे केलं ते सार्थक आहे का. असा प्रश्न स्वत:ला विचारा.
६) अलार्मचा वापर करू नका. यामुळे दिवसाची आणि भविष्याची दिशा ठरत असते. तुम्ही ज्या पद्धतीचे जेवण करता ज्या प्रमाणे झोपेची वेळ ठरवा.
७) उजव्या कुशीवर झोपा. ज्यामुळे चांगली झोप येईल. जेव्हा शरीर आराम करते तेव्हा मेटाबॉलिक स्थिती मंद होते.
८) सकाळी उठल्यानंतर हात एकमेकांवर घासून डोळ्यांना लावा. यामुळे शरीर लवकर जागते.
९) सकाळी उठताना आनंदाने उठा. प्राकृतिक कारणांमुळे अनेक जणांचा जीव जातो. जर तुम्हाला दुसरा दिवस पाहायला मिळाल तर तुम्ही जीवंत आहात याचा आनंद ठेवून चेहऱ्यावर हास्य ठेवा.
१०) झोपेतून उठताना नेहमी उजव्या बाजूनेच उठा.