बॉडी हेल्दी ठेवण्यासाठी गुड फॅट खाणं गरजेचं आहे (Sadguru). गुड फॅट हृदय आणि मेंदूसाठी फायदेशीर ठरते. गुड फॅटमुळे शरीर हेल्दी राहते. पण गुड फॅट्स नक्की कोणत्या पदार्थातून मिळते? यासाठी आपण बदाम आणि शेंगदाणा खाऊ शकता (Health Tips). सुका मेवा खाल्ल्याने शरीरातील उर्जा वाढते. शिवाय त्यातील फायबर बॅड कोलेस्टेरॉल कमी होते. शिवाय भूक कण्ट्रोलमध्ये राहते. ज्यामुळे वेट लॉस होण्यास मदत होते. पण उत्तम आरोग्यासाठी बदाम खावं की शेंगदाणे?
सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या मते, 'सकाळी रिकाम्या पोटी आपण भिजलेले शेंगदाणे आणि बदाम खाऊ शकता. यातून मिळणारे पौष्टीक घटक शरीराला फायदेशीर ठरतात'(Sadhguru's Secret To An Energetic day).
भिजलेले बदाम खाण्याचे फायदे
- एनसीबीआयच्या वेबसाईटनुसार, बदामामध्ये प्रोटीन, झिंक, ओमेगा ऍसिड ३ए, जीवनसत्त्वे आणि फायबर आढळतात. यामध्ये असलेले पोषक तत्व आपल्या संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर ठरतात. विशेषत: मेंदूच्या विकासासाठी खाल्ल्या जाणाऱ्या बदामामध्ये पॉलीफेनॉल आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात.
शिल्पा शेट्टीसारखी फिगर आणि फिटनेस पाहिजे? 'या' पिठाची खा भाकरी, पोट सपाट - त्वचाही चमकते..
- भिजलेल्या बदामाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. ज्यामुळे ब्लड शुगरची पातळी नियंत्रणात राहते. आपण नियमित सकाळी नाश्त्यामध्ये भिजलेले बदाम खाऊ शकता.
भिजलेले शेंगदाणे खाण्याचे फायदे
- शेंगदाण्यामध्ये भरपूर पोषण आणि अनेक आरोग्य फायदे आहेत. त्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन ई आणि निरोगी चरबी भरपूर प्रमाणात असतात. याशिवाय यामध्ये झिंक, सेलेनियम आणि कॉपर भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे याचे सेवन शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक, त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर ठरते.
वजन कमी होईल आणि हाडेही राहतील बळकट? मग 'या' लाल कडधान्याची उसळ खा; प्रोटीन इतकं मिळेल की..
- भिजलेले शेंगदाण्यातील पौष्टीक घटक, मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी फायदेशीर ठरते. यात मोनोसॅच्युरेडेट आणि पॉलीअनसॅच्युरेडेट असते. ज्यामुळे बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते.