Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दूषित खाद्यपदार्थ खाऊन अमेरिकेत झपाट्यानं पसरला साल्मोनेला आजार, हा नवा डेंजर आजार काय आहे?

दूषित खाद्यपदार्थ खाऊन अमेरिकेत झपाट्यानं पसरला साल्मोनेला आजार, हा नवा डेंजर आजार काय आहे?

साल्मोनेला हा एक प्रकारचा जिवाणू आहे. खाण्याशी संबंधित आजारांना हा जिवाणू कारणीभूत ठरतो. दूषित खाद्य पदार्थ खाल्ल्याने आतड्यांवर मोठ्या प्रमाणात या विषाणुचा परिणाम होतो. त्यामुळे पोटाचे आजार होण्याचा धोका वाढतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2021 02:26 PM2021-10-28T14:26:53+5:302021-10-28T14:49:56+5:30

साल्मोनेला हा एक प्रकारचा जिवाणू आहे. खाण्याशी संबंधित आजारांना हा जिवाणू कारणीभूत ठरतो. दूषित खाद्य पदार्थ खाल्ल्याने आतड्यांवर मोठ्या प्रमाणात या विषाणुचा परिणाम होतो. त्यामुळे पोटाचे आजार होण्याचा धोका वाढतो.

Salmonella spreads rapidly in the United States by eating contaminated food, what is this new dangerous disease? | दूषित खाद्यपदार्थ खाऊन अमेरिकेत झपाट्यानं पसरला साल्मोनेला आजार, हा नवा डेंजर आजार काय आहे?

दूषित खाद्यपदार्थ खाऊन अमेरिकेत झपाट्यानं पसरला साल्मोनेला आजार, हा नवा डेंजर आजार काय आहे?

Highlightsतज्ज्ञ सांगतात की, कच्ची फळं, भाज्या, पालेभाज्या यात हा विषाणु लपलेला असतो. हा जिवाणु प्राण्यांच्या आणि मानवाच्या आतड्यात आढळतो. हा जिवाणू डोळ्यांनी दिसत नाही .साल्मोनेला हा विषाणू रक्तप्रवाहात पोहोचला तर त्याचा परिणाम मेंदू, पाठीचा कणा, तेथील उती, पेशी यांचं नुकसान करतो.

आपल्याकडे कांदा महाग झाला म्हणून कांदा लोकांच्या काळजीचा विषय झाला आहे तर तिकडे अमेरिकेत लोकं कांद्यामुळे आजारी पडत आहेत. सध्या अमेरिकेत साल्मोनेला या आजारानं भीतीचं वातावरण तयार केलं आहे. हा आजार मॉस्कोमधून आयात केलेल्या कांद्यातून पसरला असल्याचं येथे म्हटलं जात आहे. कांद्यामुळे गंभीर आजार ही बातमी कांदाप्रेमींची चिंता वाढवणारी नक्कीच आहे. पण कांदा आणि साल्मोनेला यांच्यातील संबंधाबाबतचं लोकांमधलं कुतुहलही वाढलं आहे.

अमेरिकेत कांदा दोषी का?

‘ अमेरिकेतील सेंटर फॉर डिजीज कंट्रोल’ने साल्मोनेला या आजारासाठी कांदा जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. तसेच या संस्थेने तेथील नागरिकांना कच्चा कांदा न खाण्याचा तसेच कांद्यावर स्टिकर किंवा पॅकेजिंग नसेल तर असा कांदा त्वरित फेकून देण्याचा सल्ला दिला आहे. अमेरिकेतील या आजाराचा प्रकोप बघता जगभरात या साल्मोनेला आजाराबाबत माहितीचा प्रचार प्रसार सुरु आहे.

Image: Google

कांदाच नाही तर दूषित अन्नामुळे होतो आजार!

साल्मोनेला हा एक प्रकारचा जिवाणू आहे. खाण्याशी संबंधित आजारांना हा जिवाणू कारणीभूत ठरतो. दूषित खाद्य पदार्थ खाल्ल्याने आतड्यांवर मोठ्या प्रमाणात या विषाणुचा परिणाम होतो. त्यामुळे पोटाचे आजार होण्याचा धोका वाढतो.

जिवाणुंमुळे होणार्‍या आजारांना ‘साल्मोनेलोसिस’असं म्हटलं जातं. हा जिवाणु प्राण्यांच्या आणि मानवाच्या आतड्यात आढळतो. हा जिवाणु डोळ्यांनी दिसत नाही आणि इतर पंचेद्रियांद्वारेही ओळखता येत नाही. त्यामुळेच शरीरात हा जिवाणु आहे , हे शोधणं जरा अवघड होतं. म्हणूनच साल्मोनेला या आजाराच्या स्वरुपाबद्दल, त्याच्या कारणांबद्दल माहीती असणं आवश्यक् आहे.

साल्मोनेला का पसरतो?

1. साल्मोनेलाचा प्रसार प्रामुख्याने अर्धवट शिजलेलं मांस खाल्ल्याने, अर्धवट उकडलेलं अंड खाल्ल्याने होतो.

2. तज्ज्ञ सांगतात की कच्ची फळं, भाज्या, पालेभाज्या यात हा विषाणु लपलेला असतो. म्हणून भाजी चिरण्याआधी ती नीट धुवून घ्यावी.

3.टॉयलेट बाथरुम वापरताना, लहान मुलांचे डायपर बदलून झाल्यावर नीट हात धुतले नसतील तर साल्मोनेला आजाराचं संक्रमण होण्याचा धोका असतो.

4. पाश्चराइज्ड नसलेलं दूध आणि दुधाचे पदार्थ खाणे ही कारणंही साल्मोनेला कारणीभूत ठरतात.

5. तज्ज्ञ म्हणतात धान्यं काढताना, धुतांना, त्याची पॅकिंग करताना खाद्य पदार्थ साल्मोनेलाने दूषित होण्याचा धोका असतो. तर याबाबत झालेला अभ्यास सांगतो की पिकांना दूषित खत घातल्यास किंवा दूषित पाण्यानं सिंचन केल्यास कांद्यासारखी पिकं साल्मोनेला या जिवाणुनं दूषित होतात.

Image: Google

साल्मोनेलाची बाधा झालीये हे कसं ओळखावं?

1. तज्ज्ञ सांगतात की कच्ची फळं, भाज्या, पालेभाज्या यात हा विषाणु लपलेला असतो. म्हणून भाजी चिरण्याआधी ती नीट धुवून घ्यावी.

2. या जिवाणुची बाधा कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकते. विशेषत: पाच वर्षाखालील मुलांमधे आणि 65 वयापेक्षा जास्त जेष्ठ व्यक्तिंसाठी हा आजार धोकादायक ठरु सकतो. कमजोर रोगप्रतिकरशक्ती असलेल्या व्यक्तींना हा आजार लगेच ग्रासतो.

3. या विषाणुची बाधा झाल्यास जीव मळमणं, उलट्या होणं. पोटात मुरडा मारणं, जुलाब होणं, थंडी वाजणं , शौचावाटे रक्त पडणं यासारख्या समस्या जाणवतात. संसर्गाची लक्षणं ही दोन ते सात दिवसांपर्यंत राहातात. तज्ज्ञ सांगतात की साल्मोनेला बॅक्टेरिया यामुळे टायफाइड किंवा इतर गंभीर आजार होण्याचा धोका असतो. यातलं एक जरी लक्षणं आढळलं तरी त्वरित डॉक्टरांन संपर्क साधण्याचा सल्ला त™ज्ञ आणि अभ्यासक यांनी दिला आहे. जोपर्यंत शरीरात या जिवाणुचा संसर्ग आहे तोपर्यंत इतर व्यक्तींपासून काळजी घेण्याची सूचनाही देण्यात आली आहे.

Image: Google

काय होतं बाधा झाल्यास?

साल्मोनेलाचा प्रसार झालेल्या व्यक्तींना सांधेदुखीचा त्रास होतो. हा त्रास बर्‍याच दिवस राहातो. यामुळे रोजची काम करणंही अवघड होतं. साल्मोनेला हा विषाणू रक्तप्रवाहात पोहोचला तर त्याचा परिणाम मेंदू, पाठीचा कणा, तिथील उती, पेशी यांचं नुकसान होतं.

Image: Google

या जिवाणुच्या संसर्गानं जाणवणारी लक्षणं उपचाराशिवाय 4 ते 7 दिवसात आपोआप निघून जातात. पण बाधा झाल्यानंतर सात दिवसानंतरही चांगलं वाटत नसेल तसेच दिवसभरात 3 पेक्षा जास्त जुलाब झाल्यास किंवा 102 डिग्री फॅरनेहाइट ताप राहिल्यास, सतत उल्टी होत असल्यास, तोंड कोरडं पडत असल्यास, सतत मळमळ होत असल्यास त्वरित डॉक्टरांना संपर्क करण्याच सल्ला संशोधक अभ्यासक देतात. साल्मोनेलाने डायरिया होतो. यामुळे शरीरातील पाणीही खूप कमी होतं. त्यामुळे लक्षणं जाणवली, गंभीर वटली तर लगेच डॉक्टरांना भेटावं असं तज्ज्ञ सांगतात.

Web Title: Salmonella spreads rapidly in the United States by eating contaminated food, what is this new dangerous disease?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.