Join us   

घटस्फोटानंतर प्रसिद्ध अभिनेत्री समंथाला झाला विचित्र आजार, काय होतो नक्की त्रास?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2022 11:38 AM

Samantha Ruth Prabhu Skin Disease Polymorphous Light Eruption : अभिनेत्रींना अनेकदा आऊटडोअर शूट करावे लागत असल्याने योग्य ती काळजी घ्यावीच लागते.

ठळक मुद्दे समंथाच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते आतुर असतात. समंथाच्या आजारपणामुळे या शूटिंगचे वेळापत्रक आता पुढे ढकलण्यात आलं आहे.

प्रसिद्ध तमिळ अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu)मागील काही दिवसांपासून नागा चैतन्यसोबत होत असलेल्या घटस्फोटामुळे बरीच चर्चेत आहे. ४ वर्ष सोबत राहील्यावर या दोघांचा घटस्फोट चाहत्यांसाठी धक्कादायक होता. नुकतीच घटस्फोटाच्या धक्क्यातून सावरत आता समंथा काही प्रमाणात सामान्य आयुष्य जगायला लागली आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टीव्ह अअसल्यामुळे या माध्यमातून तिच्या आयुष्यातील अपडेटस तिच्या चाहत्यांना कायमच मिळत असतात. नुकतीच समंथा नागा चैतन्य आणि शोभिता यांच्या रिलेशनबाबत व्यक्त झाली होती. आता तिच्यापुढे आणखी एक समस्या निर्माण झाली आहे. ती म्हणजे समंथाला त्वचेशी निगडीत एका समस्येचा सामना करावा लागत आहे (Samantha Ruth Prabhu Skin Disease Polymorphous Light Eruption). 

समंथा एका आजाराशी झुंज देत असून तिच्या चाहत्यांसाठी ही वाईट बातमी आहे. अभिनेत्री म्हटल्यावर तुमचे शरीर, त्वचा, चेहरा या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. मात्र त्यालाच काही झाले की अभिनेत्रींपुढे मोठी समस्या निर्माण होते.  समंथा रुथ प्रभू त्वचेशी संबंधित आजाराशी झुंज देत आहे. या आजाराला 'पॉलीमॉर्फ्स लाइट एरप्शन' (Polymorphous Light Eruption)म्हणतात. त्वचारोगतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हा फारसा गंभीर आजार नाही. सूर्यप्रकाशामुळे त्वचेवर पुरळ येणे, खाज येणे किंवा काही वेळा डाग पडणे अशा समस्या निर्माण होतात. अनेकांना या प्रकारची अॅलर्जी होण्याची शक्यता असते. मात्र सामान्य उपचारांमुळे ही समस्या बरी होते. पण अभिनेत्रींना अनेकदा आऊटडोअर शूट करावे लागत असल्याने त्यांचा थेट सूर्यप्रकाशाशी संबंध येतो. त्यामुळे त्यांना आपल्या त्वचेची योग्य ती काळजी घ्यावी लागते. 

(Image : Google)

यामुळेच समंथा कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत नाही. या कारणामुळेच समंथाने सध्या कामातून ब्रेक घेतला आहे. ही बातमी समोर येताच तिचे चाहते प्रचंड नाराज झाले आहेत. समांथाचे चाहते तिला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत. सध्या समंथा ही पुढच्या 'खुशी' या चित्रपटाचे शूटिंग करत होती, पण आजारपणामुळे तिने चित्रपटाचे शूटिंग मध्येच थांबवले आणि उपचारासाठी थेट परदेशात रवाना झाली. या चित्रपटात सामंथासोबत विजय देवरकोंडा दिसणार आहे. समंथाच्या आजारपणामुळे या शूटिंगचे वेळापत्रक आता पुढे ढकलण्यात आलं आहे. दाक्षिणात्य चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचे चाहते केवळ भारतातच नाही तर जगभरातदेखील आहेत. समंथाच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते आतुर असतात.