भारतासह जगातील सर्व देशांमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकाराच्या संसर्गाची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. वाढत्या संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी बहुतांश देशांनी निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. भारता झपाट्याने वाढणारा धोका लक्षात घेता आरोग्य तज्ज्ञांकडून सर्व लोकांना त्यापासून विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. (Difference between seasonal flu and omicron)
आरोग्य तज्ञांच्या मते, सर्व लोकांनी कोरोनाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा करू नये. मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि हाताची स्वच्छता या नियमांचे पालन केल्यास कोरोनापासून सुरक्षित राहू शकतो. याशिवाय सर्व लोकांना कोविड-19 च्या लक्षणांवर विशेष लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आरोग्य तज्ज्ञांचे असे म्हणणे असले तरी, कोरोनाची काही लक्षणे सिजनल फ्लूसारखी असू शकतात, परंतु त्यातील फरक ओळखणे महत्वाचे आहे. सर्दी आणि घसा खवखवणे ही लक्षणे नेहमीच कोरोनाची नसतात.
आरोग्य तज्ज्ञ काय सांगतात?
अमर उजाला यांच्याशी संवाद साधताना, अतिदक्षता विभागाचे वरिष्ठ डॉक्टर विवेक सहाय म्हणाले की, "सध्या देशात कोरोनाच्या या नवीन प्रकाराची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. दुसरीकडे, या थंडीच्या मोसमात सामान्य सर्दीचे प्रमाणही वाढते. कोविड -19 आणि सामान्य सर्दी ची काही लक्षणे सारखी असू शकतात. म्हणून, या दोघांमधील फरक समजून घेणे फार महत्वाचे आहे. तुम्हाला कोणत्याही लक्षणांबाबत शंका असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आपल्याला कोविड-19 ची समस्या आहे की सामान्य सर्दी आहे हे कसं ओळखायचं ते माहीत असायला हवं.''
ओमायक्रॉनशी लढण्याची क्षमता कमी करतात 'हे' पदार्थ; वाचा इम्यूनिटी वाढवण्याचा सोपा उपाय
ओमिक्रॉन, कोविड-१९ ची लक्षणं
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कोविड-19 किंवा ओमिक्रॉनच्या लक्षणांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. COVID-19 च्या लक्षणांमध्ये हलका ताप, घसा खवखवणे किंवा दुखणे, नाक वाहणे, खोकला-शिंका येणे, अंगदुखी आणि रात्री जास्त घाम येणे, विशेषत: ओमिक्रॉन प्रकरणांमध्ये यांचा समावेश होतो. काही संक्रमित व्यक्तींमध्ये त्वचेवर पुरळ उठण्याची समस्या देखील नोंदवली गेली आहे, अशा लक्षणांकडे वेळीच लक्ष द्यायला हवं.
'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे वाढतोय अचानक येणाऱ्या हार्ट अटॅकचा धोका; तज्ज्ञ सांगतात की
सीजनल फ्लूची लक्षणं
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, थंडीच्या मोसमात सिझनल फ्लूची समस्या असणे सामान्य मानले जाते. हंगामी फ्लूची काही लक्षणे कोविड-19 सारखीच असू शकतात, त्यात फरक करणे आवश्यक आहे. हंगामी फ्लूमुळे ताप किंवा थंडी वाजून येणे, खोकला, धाप लागणे, थकवा येणे, घसा खवखवणे, नाक बंद होणे, स्नायू किंवा शरीरात दुखणे होऊ शकते. कोविड-19 आणि सीझनल फ्लू या दोन्ही आजारांची प्रकरणे या मोसमात दिसून येत असल्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये.
साधा फ्लू आणि कोरोनाच्या लक्षणांमध्ये फरक काय?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कोविड-19 आणि साधा फ्लू यात सहज फरक ओळखणे कठीण होऊ शकते. काही लक्षणे दोन्हींमध्ये भिन्न असू शकतात. कोविडची वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे म्हणजे सतत खोकला, उच्च तापमान आणि चव आणि वास कमी होणे. सिजनल फ्लूमध्ये ही लक्षणं तीव्रतेनं दिसत नाहीत. Omicron ला सध्या चव किंवा वासाची कोणतीही समस्या नाही. तुमची लक्षणे दोन ते चार दिवस टिकून राहिल्यास आणि कोविड-19 ची शंका असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तपासणी करा. समस्येचे वेळेवर निदान आणि उपचार दोन्ही स्थितींमध्ये अत्यंत आवश्यक आहे.