उन्हाळ्यात पाणी पिऊनही तहान भागत नाही. म्हणून अनेक जण फ्रिजचे पाणी पितात. त्या पाण्याने क्षणभर बरे वाटते, मात्र थोड्यावेळाने जास्त तहान लागते. यावर बेस्ट उपाय म्हणजे माठाचे पाणी! जे तहान भागवते आणि शरीरालाही अपायकारक ठरत नाही. असेच अनेक खाद्यपदार्थ आहेत, ज्यांची निवड करून आपण उन्हाळा अधिक सुसह्य बनवू शकतो. त्याबद्दल जाणून घेऊ.
उदाहरणार्थ, उन्हाळा सुरु होताच अनेक जण रोज रात्री आईस्क्रीम खाण्याचा रतीब लावतात. आईस्क्रीम खाऊन गार वाटते असले तरी ते खाल्ल्याने शरीराची उष्णता मात्र वाढते. आहे की नाही विरोधाभास? त्यासाठीच शरीराला नैर्सर्गिकरित्या थंड आणि उष्ण करणारे पदार्थ कोणते? यातला फरक जाणून घेऊ.
शरीरासाठी थंड पदार्थ -
कलिंगड , सफरचंद , चिकू, लिंबू, कांदा, काकडी, पालक, कच्चा टोमॅटो, कोबी, गाजर, मुळा, कोथिंबीर, पुदिना, भेंडी, बीट, बडीशेप, वेलची, डाळिंब, बर्फ न घातलेला उसाचा रस, शहाळं, पंचामृत (दही, दूध, तूप, मध, साखर), मूग डाळ, तूर डाळ, चणा डाळ, कॉफी, उकडलेल्या शेवग्याच्या शेंगा, ज्वारी, नाचणी, दूध, दही, तूप, ताक, माठातले पाणी, एरंडेल तेल, तुळस, तुळशीचे बी, सब्जा बी, नीरा, मनुका
शरीरासाठी उष्ण पदार्थ -
संत्री, आंबा, आलं, लसूण, बटाटा, कारले, मिरची, मका, मेथी, वांगी,गवार, पपई, अननस, मध, गूळ, तीळ, शेंगदाणे, बदाम, काजू, अक्रोड, खजूर, हळद, चहा, पनीर, बाजरी, आईस्क्रीम, श्रीखंड, आम्रखंड, फ्रिजमधले पाणी, पाव, खारी, बिस्कीट, हॉट ड्रिंक, कोल्ड ड्रिंक, मांसाहार
यादी वाचून तुम्ही नक्कीच सावध झाले असाल. आजवर ज्या गोष्टींना आपण थंड समजत होतो, तेच उन्हाळ्यात उष्ण बनून आपल्या शरीराला हानी पोहोचवतात. त्यामुळे ऋतुमानानुसार आपला आहार बदला आणि निसर्गाशी समरस होऊन स्वतःमध्ये आणि आहारामध्ये आवश्यक बदल करा.
हे ही वाचा : वाढत्या उन्हाळ्यात 'अशी' घ्या काळजी, राहा सुपरकुल!