हॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री व गायिका सेलिना गोमेझ आपल्या गायिकीमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. ती सोशल मिडीयावर प्रचंड सक्रीय असते. तिचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. तिने नुकतंच टिकटॉकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तिने स्किनकेयर प्रोडक्ट्स संदर्भात माहिती दिली आहे. ज्यात ती ते प्रोडक्ट्स वापरत देखील आहे. या व्हिडिओमध्ये सेलिना तोंड धुताना दिसत आहे. त्यानंतर ती तोंड टॉवेलने साफ करताना दिसत आहे. मात्र तोंड साफ करताना तिचा हाथ थरथरताना दिसत आहे. हे दृश्य पाहून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. तिने या आजारासंदर्भात आपल्या सोशल मिडिया अकांऊटवर माहिती दिली आहे.
सेलिना गोमेझने चाहत्यांना हात थरथरण्याचे कारण सांगितले, तिला ल्युपस नावाच्या आजाराने ग्रासले आहे, औषधोपचारामुळे तिचे हात थरथरत आहेत. सेलिना गोमेझने आपल्या मानसिक आणि शारीरिक आजाराबद्दल बोलण्यास कधीही संकोच केले नाही. याआधीही सेलिनाने पब्लिक प्लॅटफॉर्मवर चाहत्यांना तिचे नैराश्य आणि ल्युपस आजाराबद्दल सांगितले आहे. २०१४ साली सेलिना गोमेझला या आजारासंदर्भात माहिती मिळाली, त्यानंतर २०१७ साली तिने किडनी ट्रांसप्लांट देखील केले. तिने आजचागायत अनेक आजारांशी दोन केले आहेत.
अलीकडेच सेलिना गोमेझने तिच्या ''सेलिना गोमेझ: माय माइंड अँड मी'' या माहितीपटातून तिच्या आजाराविषयी चाहत्यांना माहिती दिली. या डॉक्युमेंट्रीदरम्यान ती तिच्या प्रकृतीबद्दल सांगताना प्रचंड रडली होती.
ल्युपस आजार म्हणजे काय?
'ल्युपस' हा विकार सामान्यपणे १५ ते ४० या वयोगटातील लोकांना होतो. हा आजार महिलांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. बाळंतपण, रजोनिवृत्ती किंवा पौगंडावस्थेत होणारे संप्रेरकांमधील बदल 'ल्युपस'ला कारणीभूत ठरतात. सांध्यांतील वेदना तसेच सूज ही लक्षणे प्राथमिक स्वरुपात दिसात.
ल्युपस हा रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधित आजार आहे. ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्या अवयवांवर हल्ला करू लागते. बहुतांश प्रकरणांमध्ये, ल्युपस त्वचा, हृदय, मेंदू आणि रक्तवाहिन्यांवर देखील परिणाम करते.
आरोग्य तज्ञांच्या मते, या आजाराचा सामना करणारे बहुतेक लोक आजारी राहतात. तापासोबतच त्यांना वजन कमी आणि थकवा जाणवत राहते. दुसरीकडे, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती शरीराच्या एखाद्या विशिष्ट भागावर हल्ला करते. या आजारात रुग्ण सायक्लोस्पोरिन नावाचे औषध घेतात, ज्यामुळे त्यांच्या शरीराचा कोणताही भाग थरथर कापू लागतो. ल्युपस या आजारावर कोणताही इलाज नसला तरी, लक्षणे व्यवस्थापित करण्यात मदत करणारे उपचार आहेत.