Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > हाडं कमजोर झाली? पोकळ हाडांना कॅल्शियम देतात इवल्याश्या बिया; चमचाभर खा-निरोगी राहा

हाडं कमजोर झाली? पोकळ हाडांना कॅल्शियम देतात इवल्याश्या बिया; चमचाभर खा-निरोगी राहा

Sesame Seeds Good For Bones Natural Source Of Calcium : रोज २०० ग्राम पांढरे तिळ खाल्ल्यानं कॅल्शियमची गरज पूर्ण करता येते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 10:03 PM2024-10-21T22:03:08+5:302024-10-21T22:04:46+5:30

Sesame Seeds Good For Bones Natural Source Of Calcium : रोज २०० ग्राम पांढरे तिळ खाल्ल्यानं कॅल्शियमची गरज पूर्ण करता येते.

Sesame Seeds Good For Bones Natural Source Of Calcium : White Sesame Seeds Health Benefits For Bones | हाडं कमजोर झाली? पोकळ हाडांना कॅल्शियम देतात इवल्याश्या बिया; चमचाभर खा-निरोगी राहा

हाडं कमजोर झाली? पोकळ हाडांना कॅल्शियम देतात इवल्याश्या बिया; चमचाभर खा-निरोगी राहा

तीळ आरोग्यासाठी सुपरफूड मानले जाते. दिसायला छोट्या दिसणारे तीळ शरीराला बरेच फायदे देतात. पांढऱ्या तिळाचे सेवन हिवाळ्यात केले जाते. (Health Tips) बदलत्या वातावरणात तिळाचा आहारात समावेश केल्यास केल्यास इम्यूनिटी मजबूत राहण्यास मदत होते आणि तुम्ही आजारी पडत नाहीत. शरीर गरम राहण्यास आणि हाडं मजबूत होण्यास मदत होते. सांधेदुखीच्या वेदनांपासूनही आराम मिळतो. तीळ गरम असतात थंडीच्या दिवसांत तिळाचे सेवन केल्यानं शरीर गरम राहतं. (Sesame Seeds Good For Bones Natural Source Of Calcium)

तीळ खाल्ल्यानं हाडं मजबूत राहतात

तिळाला कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत मानलं जाते. तीळ खाल्ल्यानं हाडं मजबूत राहतात. रोज २०० ग्राम पांढरे तिळ खाल्ल्यानं कॅल्शियमची गरज पूर्ण करता येते. यामुळे हाडांच्या वेदना दूर होतात आणि हाडं मजबूत  बनतात. सांधेदुखीच्या वेदना दूर होण्यास  मदत होते.

पांढरे तीळ खाल्ल्यानं शरीराला भरपूर एनर्जी मिळते. दिवसभरात जर तुम्ही १ मूठ तीळ खाल्ले तर आळस, कमजोरी, थकवा दूर होतो. शरीर एक्टिव्ह राहते आणि तुम्हाला फिट वाटते. थंडीत उद्भवणाऱ्या आजारांपासून दूर राहता येते. तिळाचे सेवन केल्यानं शरीरात गरमी टिकून राहते. शरीरात होणाऱ्या वेदना, सांधेदुखी, खोकला यांपासून सुटका मिळते. पांढरे तीळ खाल्ल्यानं कोलेस्टेरॉल लेव्हल नियंत्रणात राहते. 

तिळाचे सेवन केल्यानं शरीरात उष्णता टिकून राहते. शरीरात होणाऱ्या वेदना, सांधेदुखी, सर्दीपासून आराम मिळतो. पांढरे तिळ खाल्ल्यानं कोलेस्टेरॉल लेव्हल कमी होते आणि पचनक्रिया चांगली राहते. कॅल्शियम व्यतिरिक्त तिळात जिंक, कॉपर, मॅग्नेशियम आणि हेल्दी फॅट्स असतात.

तिळाचे सेवन कसे करावे? (How To Consume Sesame Seeds)

हाडं मजबूत ठेवण्यासाठी तीळ दूधात घालून पिण्याचा सल्ला दिला जातो. यासाठी पांढरे तीळ तव्यावर भाजून घ्या. तीळ थंड झाल्यानंतर वाटून त्याची पावडर बनवा. तिळाची पावडर १ चमचाभर घ्या आणि  दुधासोबत सकाळी आणि संध्याकाळी  दोन्ही वेळा प्या. यामुळे शरीर ताकदवान बनेल. दूध अधिक ताकदवान बनवण्यासाठी तुम्ही ड्राय फ्रुट्स् जसं की काजू, बदाम मिसळून पिऊ शकता. या पद्धतीनं रोज दूध प्यायल्यानं हाडं मजबूत होतात. 

Web Title: Sesame Seeds Good For Bones Natural Source Of Calcium : White Sesame Seeds Health Benefits For Bones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.