बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानला काय आवडतं? त्याचं फिटनेस रुटीन कसं असतं? त्याचा आवडता पदार्थ कोणता? यासह अनेक प्रश्नांची उत्तरं त्याचे चाहते शोधत असतात. अलीकडेच शाहरुखने एका मुलाखतीत तो किती वाजता झोपतो? त्याला खायला काय आवडतं? एकंदरीत जीवनशैलीतील अनेक खुलासे केले आहेत.
स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी शाहरुख कधीही व्यायाम चुकवत नाही. शिवाय ४ ते ५ तासांची झोप घेतो. निरोगी आयुष्य जगण्यासाठी ७ तासांची झोप आवश्यक असते असं तज्ज्ञ सांगतात. कमी झोप घेण्याचे तोटे किती? कमी झोप घेतल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होतो का?(Shah Rukh Khan says sleeps for 4-5 hours, eats one meal in a day: ‘I go to sleep at five in the morning’).
द गार्डियन'शी बोलताना शाहरुखने स्लीप सायकलबद्दल माहिती शेअर केली. त्याने सांगितले की शुटींगमुळे तो सकाळी ५ वाजता झोपतो पण ९ किंवा १० वाजता उठतो. २ वाजता कामावरून घरी पोहोचल्यानंतर तो अंघोळ करतो आणि झोपण्यापूर्वी व्यायाम करतो. तो दररोज फक्त अर्धा तास व्यायाम करतो. रिपोर्टनुसार, तो फक्त एकदाच अन्न खातो.
व्यायामाला वेळ नाही - तोंडाचाही ताबा सुटतो? ४ स्मार्ट गोष्टी करा; दिसाल सुडौल - राहाल कायम फिट
मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपण्यासाठी उत्तम आहार आणि झोप घेणे महत्वाचे आहे. नॅशनल स्लीप फाऊंडेशननुसार, उत्तम आरोग्य आणि वाढीसाठी प्रत्येक वयोगटातील लोकांची झोपेची गरज ही वेगवेगळी असते. मात्र, निरोगी आयुष्य जगण्यासाठी किमान ७ तासांची झोप आवश्यक.
८ तासांची झोप आवश्यक कारण..
- हृदयविकार, स्ट्रोक आणि मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी ८ तासांची झोप आवश्यक. यामुळे हृदयाच्या समस्यांचा धोका कमी होतो. झोप पूर्ण झाली तर, रक्तदाब संतुलित करण्यास मदत होते.
वजन कमी करायचं म्हणून साखर बंद करुन गुळ किंवा मध खाता? आहारतज्ज्ञ सांगतात, फायद्याचं नेमकं काय..
- ८ तासांची झोप पूर्ण झाल्यास मेंदूच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. यामुळे मेंदूचे कार्य, स्मरणशक्ती, एकाग्रता आणि संज्ञानात्मक कार्यास समर्थन देते.
- चांगली झोप घेतल्याने वजन नियंत्रणात राहते. पुरेशी विश्रांती रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. ज्यामुळे ऋतू बदलांमुळे होणारे आजार दूर राहतात.