बदलत्या जीवनशैलीमुळे शांत झोप न येणे किंवा मध्यरात्रीनंतर कधीतरी डोळा लागणे, झोप लागली तरी लगेच जाग येणे अशा झोपेविषयीच्या समस्या अनेक जणांना जाणवतात. यालाच Insomnia असं म्हणतात. रात्रीची झोप जर शांत आणि पुर्ण होत नसेल आणि वारंवारच असं होत असेल तर त्यातून अनेक आजार निर्माण होऊ शकतात. स्ट्रेस, डिप्रेशन यासारखा मानसिक त्रासही होऊ शकतो. म्हणूनच मानसिक त्रास होऊ नये म्हणून रात्रीची झोप शांत आणि पुर्ण घेणं गरजेचं आहे. आणि शांत झोप लागण्यासाठी आपल्या पार्टनरसोबत बेड शेअर करून झोपावं की एकटंच झोपावं, याविषयी बघा हा अभ्यास काय सांगतो....(Sharing bed or sleeping alone, which is better for your mental health and sound sleep?)
शांत झोप येण्यासाठी पार्टनरसोबत झोपणं चांगलं की एकटं झोपणं चांगलं याविषयी University of Arizona यांच्यातर्फे नुकताच अभ्यास करण्यात आला असून त्यांनी केलेला अभ्यास American Academy of Sleep Medicine मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.
या अभ्यासानुसार असं आढळून आलं आहे की जे लोक त्यांच्या पार्टनरसोबत एकाच बेडवर झोपतात त्या लोकांना एकटं झोपणाऱ्या लोकांच्या तुलनेत insomnia हा आजार कमी प्रमाणात दिसून आला. त्या लोकांना शांत झोप लागते. शिवाय त्यांना येणारा मानसिक थकवाही खूप कमी असतो. एन्झायटी, स्ट्रेस हा आजार त्या लाेकांमध्ये खूप कमी दिसून आला शिवाय त्यांना बेडवर पडल्यानंतर खूपच कमी वेळात खूप शांत झोप आली.
पण काही अभ्यासकांच्या मते ज्यांना शांत झोप लागत नाही, त्यांनी कुणासोबतही बेड शेअर न करता स्वतंत्रपणे झोपावे.
चोरट्याने चोरलेला फोन पावभाजीने मिळूवन दिला- बघा कशी झाली गंमत- वाचा व्हायरल पोस्ट
कारण जर पार्टनरची काही हालचाल झाली, पार्टनरला घोरण्याची सवय असेल तर त्याचा त्रास होऊन झोपेवर आणखीनच वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे स्लीप डिव्होर्स हा पर्याय त्यांना उत्तम वाटतो. स्लीप डिव्होर्स म्हणजेच दोन्ही पार्टनरनी दोन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये जाऊन शांतपणे झोपणे. हल्ली झोपेशी संबंधित समस्यांमुळे हा ट्रेण्ड खूप वेगात लोकांकडून स्वीकारला जात आहे.