Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > शहनाज गिलला झाला फूड पॉयझनिंगचा त्रास, बाहेरचे खाताना जरा जपून - गाठावा लागेल थेट दवाखाना

शहनाज गिलला झाला फूड पॉयझनिंगचा त्रास, बाहेरचे खाताना जरा जपून - गाठावा लागेल थेट दवाखाना

Shehnaaz Gill Hospitalised Due to Food Poisoning : अन्नातून विषबाध झाल्यास वेळीच उपचार घेणं गरजेचं आहे, अन्यथा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2023 02:20 PM2023-10-12T14:20:23+5:302023-10-12T14:21:08+5:30

Shehnaaz Gill Hospitalised Due to Food Poisoning : अन्नातून विषबाध झाल्यास वेळीच उपचार घेणं गरजेचं आहे, अन्यथा..

Shehnaaz Gill Hospitalised Due to Food Poisoning | शहनाज गिलला झाला फूड पॉयझनिंगचा त्रास, बाहेरचे खाताना जरा जपून - गाठावा लागेल थेट दवाखाना

शहनाज गिलला झाला फूड पॉयझनिंगचा त्रास, बाहेरचे खाताना जरा जपून - गाठावा लागेल थेट दवाखाना

बिग बॉस १३ ची स्पर्धक आणि अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) आपल्या चुलबुली अंदाजासाठी ओळखली जाते. मात्र, काही दिवसांपूर्वी तिला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिने सोशल मीडियावर लाईव्ह येत चाहत्यांना आपल्या प्रकृतीबद्दल माहिती दिली होती.

पोटाचा संसर्ग झाल्यामुळे तिची प्रकृती बिघडल्याचं तिने सांगितलं होतं. परंतु, आता तिची तब्येत ठीक असून, तिच्या तब्येतीत झालेला सुधार पाहून चाहतेही खुश झाले असल्याचं पाहायला मिळालं. मात्र, फूड पॉयझनिंग (Food Poisoning) कशामुळे होते? हे टाळण्यासाठी आरोग्याची कशी काळजी घ्यावी? पाहूयात(Shehnaaz Gill Hospitalised Due to Food Poisoning).

फूड पॉइजनिंगमुळे रुग्णालयात दाखल

मिडिया रिपोर्ट्सनुसार, शहनाज गिलला फूड इन्फेक्शनमुळे दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. लाईव्ह सेशनमध्ये येत शहनाज म्हणते, 'मी सँडविच खाल्ले होते, त्यानंतर माझी तब्येत बिघडू लागली. मला अन्नातून विषबाधा झाली होती. परंतु, आता प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे.'

जेवताना वरण किंवा डाळीसोबत अजिबात खाऊ नका ३ पदार्थ, पोट हमखास बिघडते

फूड पॉयझनिंग कशामुळे होते?

उन्हाळा असो किंवा पावसाळा प्रत्येक ऋतूत कोणत्याही व्यक्तीला कधीही फूड पॉयझनिंगची समस्या निर्माण होऊ शकते. उन्हाळा आणि पावसाळ्यात अन्न जास्त वेळ बाहेर ठेवल्यास त्यामध्ये ई-कोलाय, साल्मोनेला, लिस्टेरिया यांसारखे बॅक्टेरिया वाढतात. ते पोटात जाऊन संसर्ग पसरवतात आणि यामुळे अन्नातून विषबाधा होण्याची समस्या उद्भवते.

फूड पॉयझनिंगचे पहिले आणि मुख्य लक्षण कारण म्हणजे पोटदुखी, मळमळ आणि कपाळावर जास्त घाम येणे. ही तीन लक्षणे एकत्र दिसतात. यानंतर जुलाब आणि उलटी होण्याचा त्रास सुरू होतो. यावेळी पोटात जास्त गॅस तयार होण्याची समस्याही निर्माण होते.

अन्नातून विषबाधा होऊ नये म्हणून उपाय

- अन्नातून विषबाधा टाळण्यासाठी शिळे अन्न खाऊ नका. किंवा फ्रिजमध्ये अधिक वेळ ठेवलेले अन्न खाऊ नका. कारण अशावेळी पदार्थांमध्ये जीवाणूंचा संसर्ग वाढतो. त्यामुळे पोटात इन्फेक्शन होण्याचा त्रास होतो.

- फास्ट किंवा प्रोसेस्ड फूड खाणे टाळा. बाहेरील ठेल्यावरील पदार्थ खाणं टाळा. यामुळे देखील अन्नातून विषबाधा होण्याचा धोका वाढतो.

- काहीही खाण्यापूर्वी हात साबणाने चांगले धुवा. त्यानंतर ताजे तयार केलेले अन्न खा. नेहमी फ्रेश फूड खा.

अन्नातून विषबाधा झाल्यास या टिप्स फॉलो करा

- शहनाज गिलप्रमाणे आपल्यालाही चुकीच्या आहारामुळे विषबाधा झाली असेल, तर या काळात तळकट, जंक फूड, किंवा ठेल्यावरील पदार्थ खाणं टाळा.

ग्लासभर दुधात घाला एक चमचा मध, सकाळी पोट साफ होण्याची समस्या टळेल, आरोग्यही सुधारेल

- या काळात, मसालेयुक्त पदार्थ खाणे टाळा.

- शिवाय भरपूर पाणी आणि हलके पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा. खिचडी, दलिया इत्यादी पदार्थ खा. डाएटसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Shehnaaz Gill Hospitalised Due to Food Poisoning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.