Join us   

जेवण झाल्यावर थोडासा लिंबाचा रस पिण्याचे पाहा फायदे-पचन सुधारतेच आणि वजन कमी करायचं तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2024 4:45 PM

Should Lemon Water Be Taken Before Or After Dinner? : आहारतज्ज्ञांनी सांगितले जेवणानंतर चमचाभर लिंबाचा रस प्या; आरोग्य सुधारेल

लिंबाचे अनेक आश्चर्यकारक फायदे आहेत (Lemon Water). लिंबू पाणी आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. याच्या रोजच्या सेवनाने शरीराला व्हिटॅमिन सी मिळते. ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते (Digestion). शिवाय यामध्ये अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते. याचे फायदे पाहून तज्ज्ञ देखील लिंबू पाणी पिण्याचा सल्ला देतात (Health care). त्वचा सुधारण्यासोबतच ते पचन आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते.

जर शरीराला याचे अधिक फायदे मिळावे असे वाटत असेल तर, जेवल्यानंतर चमचाभर लिंबाचा रस प्या. यामुळे शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे मिळतील. यासंदर्भात, आहारतज्ज्ञ जुही अरोरा यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी जेवणानंतर एक चमचा लिंबाचा रस पिण्याचे फायदे सांगितले आहेत(Should Lemon Water Be Taken Before Or After Dinner?).

जेवणानंतर लिंबाचा रस प्यायल्याने शरीराला कोणते मिळतील?

पचन सुधारते

जेवणानंतर लिंबाचा रस प्यायल्याने खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचते. खरंतर लिंबाचे रस पाचक रस आणि एन्झाईम्सचे उत्पादन वाढवण्याचे काम करते.

पीएच संतुलित ठेवते

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे शरीरातील पीएच पातळी संतुलित ठेवण्यास मदत होते, व ॲसिडिटीची समस्या कमी होते.

दह्यात नेहमी साखर घालून खाता? पाहा ५ गंभीर दुष्परिणाम; वजन झपाट्याने वाढेलच आणि पचन..

रोगप्रतिकार शक्ती वाढवते आणि कॉलेजन वाढवते

लिंबूमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि कोलेजनचे उत्पादन वाढते. यामुळे त्वचा ग्लो करते.

अँटिऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध

लिंबू अँटिऑक्सिडेंट गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. शरीरातील ऑक्सिडेटिव्ह नुकसान किंवा स्ट्रेस कमी होतो. ज्यामुळे आपले शरीर निरोगी राहते.

योगाभ्यासाने जगणं बदललं, अस्थमा कमी झाला आणि.. योगशिक्षक रुपाली मोरे सांगतात बदललेल्या जगण्याची गोष्ट..

अपचनाच्या त्रासापासून आराम

जर आपल्याला अपचनाची समस्या असेल तर, जेवणानंतर चमचाभर लिंबाचा रस प्या. ज्यामुळे पोटाचे विकार आपल्याला छळत नाहीत. शिवाय पीएच पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य