काही लोकांसाठी चहा म्हणजे एनर्जी ड्रिंक (Tea). चहाशिवाय काहींची सकाळ होत नाही. पण चहाची तल्लफ मिटवता-मिटवता आपण गंभीर आजारांनाही आमंत्रण देतो. बऱ्याच चहा पिणाऱ्यांना ॲसिडीटी आणि बद्धकोष्ठतेची समस्या असते (Acidity). चहा प्यायल्यानंतर अनेकांना पोटाचे विकारही छळतात (Health Care). जर आपल्याला चहा सोडवत नसेल आणि ॲसिडीटी होऊ नये असे वाटत असेल तर, चहा पिण्याअगोदर पाणी प्या.
यासंदर्भात, आहारतज्ज्ञ स्वाती बिश्नोई सांगतात, 'चहा आपल्या शरीरात युरिन प्रॉडक्शन वाढवून पाण्याची पातळी कमी करतात. ज्यामुळे आपल्या मेंदूतील पाण्याचा साठाही कमी होतो. त्यामुळे शरीर डिहायड्रेट होते. त्यामुळे चहापेक्षा पाणी जास्त प्यायला हवे. जर आपल्याला चहा सोडवत नसेल तर, चहा किंवा कॉफी पिण्याआधी पाणी प्या(Should One Drink Water Before Tea? What The Expert Says).
रात्रीचं जेवण सोडल्यानं खरंच वजन कमी होतं? तज्ज्ञ सांगतात, नक्की खरं काय.. उपाशी राहाल पण..
कारण चहाची पीएच पातळी ६ असते. तर कॉफीची ५ असते. ज्या गोष्टीची पीएच पातळी ७ पेक्षा कमी असते. ती गोष्ट आम्लयुक्त असते. त्यामुळे जर आपण चहा किंवा कॉफी जास्त प्रमाणात पीत असाल तर, ॲसिडिटी किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.'
ॲसिडिटी अनेक आजारांना आमंत्रण देते
स्वाती बिश्नोई यांच्या मते, ॲसिडिटी अनेक आजारांना आमंत्रण देते. ॲसिडिटीमुळे आपण कॅन्सर, अल्सर आणि इतर अनेक आजारांना बळी पडू शकता. चहाप्रेमी रोज चहा पीत असतात, पण ते आपल्या आरोग्याबाबत तेवढे जागरूक नसतात. नियमित चहा आणि कॉफी प्यायल्याने पोटाचे विकारही वाढतात. त्यामुळे चहा किंवा कॉफी पिण्याआधी पाणी अवश्य प्यावे. शिवाय रिकाम्यापोटी कधीही चहा किंवा कॉफी पिऊ नये.'