Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पुरुषांच्या तुलनेत महिलांनी कमी मीठ खाणेच बरे, असं डॉक्टर का सांगतात?

पुरुषांच्या तुलनेत महिलांनी कमी मीठ खाणेच बरे, असं डॉक्टर का सांगतात?

Should Women Eat Less Salt Than Men? Doctor Answers मीठाचे नेमके प्रमाण आपल्या आहारात किती असावे, अप्रत्यक्षही आपण बरंच मीठ रोज खातो का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2023 01:57 PM2023-03-24T13:57:48+5:302023-03-24T13:58:49+5:30

Should Women Eat Less Salt Than Men? Doctor Answers मीठाचे नेमके प्रमाण आपल्या आहारात किती असावे, अप्रत्यक्षही आपण बरंच मीठ रोज खातो का?

Should Women Eat Less Salt Than Men? Doctor Answers | पुरुषांच्या तुलनेत महिलांनी कमी मीठ खाणेच बरे, असं डॉक्टर का सांगतात?

पुरुषांच्या तुलनेत महिलांनी कमी मीठ खाणेच बरे, असं डॉक्टर का सांगतात?

मिठाशिवाय अन्न बेचव लागते. मात्र मीठ आहारात किती असावे, कुणी किती मीठ खावे याचे काही नियम असतात. जास्त मीठ खाणं तब्येतीला बरं नसतंच. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार एका व्यक्तीने दररोज ५ ग्रॅम किंवा त्यापेक्षाही कमी मीठ खावे. १५ वर्षांपेक्षा कमी असलेल्या मुलांनी मिठाचे सेवन कमी करावे. मात्र पुरुषांनी किती मीठ खावे महिलांनी किती खावे असे काही वेगवेगळे नियम असतात का?

सर गंगाराम हॉस्पिटल प्रिव्हेंटिव्ह हेल्थ अँड वेलनेस विभागाच्या संचालक डॉ. सोनिया रावत सांगतात, ''सर्वसाधारणपणे स्त्रिया आणि पुरुष समान प्रमाणात मीठ खातात, परंतु पुरुषांच्या तुलनेत महिला जास्त सॉल्ट सेंसिटिव्ह असतात. जेव्हा आपण जास्त मीठ खातो, तेव्हा शरीरात अल्डोस्टेरॉन हार्मोनची पातळी वाढते, त्याचा रक्तदाबावरही परिणाम होतो. अशा परिस्थितीत महिला आणि पुरुष दोघांनीही मीठ कमी खावे. पण स्त्रिया सॉल्ट सेंसिटिव्ह असल्यामुळे त्यांनी दररोज किमान ५ ग्रॅमपेक्षाही कमी मिठाचे सेवन करावे(Should Women Eat Less Salt Than Men? Doctor Answers).

कळत - नकळत दररोज साखरेचं सेवन करता? १४ दिवस साखर सोडून पाहा, किती बदल होतो तब्येतीत

आठवड्यातून एक वेळा हे काम करा

महिला आणि पुरुष दोघांनीही आठवड्यातून एकदा बिन मीठाचे पदार्थ खावेत. यामुळे शरीरातील मिठाचे प्रमाण नियंत्रित राहते. खाण्याव्यतिरिक्त बरेच लोक स्नॅक्स किंवा इतर खारट पदार्थ खातात, ज्यामुळे शरीरात मिठाचे प्रमाण जास्त वाढते. अशा परिस्थितीत खारट स्नॅक्स टाळावेत.

डोळ्याच्या ५ समस्यांकडे दुर्लक्ष महागात पडू शकते, दृष्टी अधू होण्याचा धोका

याशिवाय लोणची आणि पापड रोज खाऊ नयेत कारण त्यात मीठ जास्त असते. मीठ प्रमाणापेक्षा कमी खाल्ल्यास रक्तदाब नियंत्रणात राहेल. अधिक मीठ पुरुष आणि महिला दोघांसाठीही घातक ठरू शकते. 

Web Title: Should Women Eat Less Salt Than Men? Doctor Answers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.