Join us   

चपातीला तूप लावून खाल्ल्याने वजन वाढते की कमी होते? चपातीवरच्या तुपाचं तज्ज्ञ सांगतात सत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2023 4:48 PM

Should you apply ghee on chapati? Is it healthy? चपातीला तूप लावण्याची आपल्याकडे पद्धत आहे पण वजन वाढण्याच्या भीतीने अनेकजण ही जुनी रीत विसरतात, पण..

भारतात जेवणाच्या थाळीत चपाती नसेल तर थाळी अपूर्ण वाटते. प्रत्येक राज्यातील लोकांची चपाती करण्याची पद्धत वेगळी आहे. काही लोकं चपातीवर तेल लावून शेकतात, तर काही तूप लावून चपातीला भाजतात. तूप खाण्याचे अनेक फायदे आहेत. काही लोकं वरण - भातासह तूप खातात. तर काही दुधात तूप मिसळून पितात. तेलाऐवजी तूप खाण्याचा सल्ला मिळतो. चपातीला तूप लावून खाल्ल्याने वजन कमी होते की वाढते? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. चपातीला तूप लावून खाल्ल्याने खरंच वजन कमी होते का? की वजन वाढते?(Should you apply ghee on chapati? Is it healthy?).

यासंदर्भात, बंगलोरमधील मुख्य क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट डॉ. प्रियंका रोहतगी सांगतात, ''शुद्ध देशी तुपात चांगले फॅट्स असतात. जसे की सॅच्युरेटेड फॅट, मोनोसॅच्युरेटेड फॅट आणि पॉलीसॅच्युरेटेड फॅट. यासोबतच यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात आढळतात. हे जीवनसत्त्वे फॅट्समध्ये विरघळतात.''

शुद्ध तूप खाण्याचे फायदे

डॉ. प्रियंका सांगतात, ''शुद्ध देशी तूप मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास शरीराला अनेक फायदे मिळतात. रोज सकाळी चपातीला तूप लावून खाल्ल्याने दिवसभर भूक लागत नाही. पोट भरलेले वाटते. तुपात फॅट सॉल्यूबल जीवनसत्त्वे आढळतात. जी हार्मोन्स संतुलित करतात आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवतात. यासोबतच तूप फ्री रॅडिकल्स कमी करते.

वॉटर फास्टिंगचा नवा ट्रेण्ड धोक्याचा! संशोधन सांगते - वजन झटपट कमी झाले तरी...

चपाती किंवा इतर पदार्थात तूप मिसळल्यास त्याचे ग्लायसेमिक इंडेक्स कमी होते. शुद्ध तूप खाल्ल्याने मन स्थिर राहते, व बुद्धी तीक्ष्ण होते. यासोबतच सांधेदुखीचा त्रासही कमी होतो. स्किन केअर रुटीनमध्ये आपण तुपाचा वापर करू शकता.''

तूप कसे खावे?

तुपात फॅटी ऍसिडचे प्रमाण खूप जास्त असते. चपातीला तूप लावून खाल्ल्याने त्यातील आवश्यक फॅटी ऍसिडचे प्रमाण वाढते. यामुळे शरीराला अधिक फायदा होतो. पण तूप जास्त शिजवून खाल्ल्यास त्यातील मुख्य कंटेंट बिघडतो. त्यामुळे चपाती शेकताना तूप लावू नये, चपाती शेकल्यानंतर एका प्लेटमध्ये घ्या, व त्यावर तूप लावून खा.

गुडघे खूप जाडजूड-बेढब दिसतात? चालताना दुखतात? -गुडघ्यांवरची चरबी कमी करण्याचे ४ उपाय

लठ्ठपणा वाढू नये म्हणून तूप किती खावे?

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा हानिकारक ठरतो. म्हणूनच दिवसातून ३ ते ४ चमच्यापेक्षा तूप खाऊ नये. तूप जास्त खाल्ले तर कॅलरीज जास्त वाढतात आणि लठ्ठपणाही वाढू शकतो, यासह कोलेस्ट्रॉलही वाढू शकते.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यअन्न