प्रत्येकाची झोपण्याची सवय वेगळी असते. काहींना कुठेही झोप लागते, तर काहींना आपल्या नियमित जागेवरच झोप लागते. परंतु, झोपण्याची सुद्धा एक पद्धत आहे. शरीरातील कार्य योग्यरीत्या चालावे यासाठी झोप महत्वाची. तज्ज्ञ ८ तासांची झोप घेण्याचा सल्ला देतात.
मात्र, अनेकदा डोकेदुखी, अन्न नीट न पचणे, सांधेदुखी यांसारख्या समस्या चुकीच्या दिशेला तोंड करून झोपल्याने उद्भवते. परंतु, आपल्याला कोणत्या दिशेला तोंड करून झोपल्याने फायदा होतो? कोणत्या कुशीवर झोपल्याने शरीराला होणारी समस्या कमी होते हे माहिती आहे का? झोपताना कोणत्या बाजूने झोपणे योग्य राहील हे पाहूयात(Should You Sleep on Your Left or Right Side? ).
कोणत्या बाजूला झोपणे योग्य?
हेल्थ लाईन या वेबसाईटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ''जर आपल्याला नियमित झोपत असलेल्या पोझिशनमध्ये नीट झोप लागत असेल तर, ती स्थिती आपल्यासाठी योग्य ठरू शकते. परंतु, एका अंगावर झोपणे योग्य असते. कारण असे झोपल्याने सांधेदुखी आणि पाठदुखीसारख्या समस्या कमी होतात. यासह शरीराला आरामही मिळतो. जर आपण डाव्या कुशीवर झोपत असाल तर ही बाजू सर्वोत्तम मानली जाते. कारण यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात.''
भिजवलेले ४ बदाम रोज उपाशीपोटी खाण्याचे फायदे, बुद्धी होईल तेज आणि वजन कमी
डाव्या बाजूला झोपण्याचे काही फायदे
- डाव्या कुशीवर झोपल्यामुळे पोटाचे आरोग्य सुधारते. पोटदुखी, अपचन, पोट बिघडणे, यासारख्या समस्यांनी त्रस्त असाल तर, डाव्या बाजूला तोंड करून झोपा. यामुळे पचनक्रियेत बरीच सुधारणा होते. जेवल्यानंतर लगेच झोपू नये.
- हार्ट बर्न, बद्धकोष्ठता आणि पोट फुगणे यासारख्या समस्यांपासून त्रस्त असाल तर, डाव्या बाजूला तोंड करून झोपा.
- सांधेदुखी होत असेल तर, डाव्या बाजूला तोंड करून झोपा, यामुळे आराम मिळेल.
बॅड कोलेस्टेरॉल कमी करायचं तर ५ प्रकारच्या बिया आहारात हव्याच, दिल-दिमाग दोन्ही तंदुरुस्त
- जर आपण हाय ब्लड प्रेशरच्या त्रासाला सामोरे जात असाल तर, डाव्या बाजूला तोंड करून झोपा. यामुळे हाय ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत मिळेल.
- यासह मधुमेह आणि हृदयविकाराचा झटका, यांसारख्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो.