Health Risks of Bathing After Coffee : चहा किंवा कॉफी प्यायल्यानंतर लगेच आंघोळ केल्यानं शरीरावर नकारात्मक प्रभाव पडतो का? अनेक लोक असं मानतात की, जेवण केल्यावर लगेच आंघोळ करू नये. चहा-कॉफीही पिऊ नये. रोजच्या या छोट्या छोट्या गोष्टींचा आपल्या आरोग्यावर खोलवर प्रभाव पडतो. यातीलच एक बाब म्हणजे आंघोळीच्या आधी चहा किंवा कॉफी पिणं. ही एक कॉमन सवय आहे. पण ही सवय बरोबर आहे का? हेच जाणून घेऊया.
चहा-कॉफी प्यायल्यावर लगेच आंघोळ टाळा
चहा किंवा कॉफीमध्ये कॅफीन आणि इतर रासायनिक तत्व असतात. जे तुमच्या शरीरातील ब्लड वेसल्सना प्रभावित करतात. जेव्हा चहा किंवा कॉफी पिता तेव्हा शरीरात उष्णता निर्माण होते आणि अशात लगेच आंघोळ केली तर शरीराचं तापमान अचानक बदलतं. त्याचा प्रभाव खालीलप्रमाणे बघायला मिळतो.
- चहा-कॉफी प्यायल्यावर लगेच आंघोळ केली तर ब्लड प्रेशर अस्थिर होतं.
- गरम ड्रिंकनंतर थंड पाणी पिणं किंवा आंघोळ केल्यानं पचन तंत्र कमजोर होतं.
- तापमानात अचानक बदल झाल्याने हृदयाची गति प्रभावित होऊ शकते.
आंघोळीआधी काय करणं टाळावं?
1) जेवणानंतर लगेच आंघोळ करू नये
जेवणानंतर लगेच आंघोळ केल्यानं ब्लड फ्लो पचन तंत्राकडून त्वचेकडे जातो. ज्यामुळे पचनक्रिया स्लो होते. त्यामुळे जेवणानंतर साधारण २ तासांनी आंघोळ करावी.
२) एक्सरसाईजनंतर लगेच आंघोळ
एक्सरसाईजनंतर शरीराचं तापमान वाढतं. लगेच आंघोळ केल्यानं मांसपेशीमध्ये तणाव किंवा थकवा जाणवतो. आधी शरीराचं तापमान सामान्य होऊ द्यावं.
३) फार जास्त थंड किंवा गरम पाणी
फार जास्त थंड किंवा गरम पाण्यानं त्वचा व हृदयावर प्रभाव पडू शकतो. कोमट पाण्याचा वापर करणं चांगलं असतं.
आंघोळ करण्याची योग्य वेळ आणि पद्धत
- सकाळी हलक्या गरम पाण्याने आंघोळ करणं सगळ्यात बेस्ट मानलं जातं. झोपेतून उठल्यावर थोडा वेळ घ्या नंतर आंघोळ करा. याने शरीर स्थिर होतं. आंघोळ केल्यानंतर चहा किंवा कॉफी पिणं अधिक चांगलं.