Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > हिवाळ्यात आंघोळ करताना करू नका 'ही' चूक, येईल हार्ट अ‍ॅटॅक, पाहा आंघोळ करण्याची योग्य पद्धत...

हिवाळ्यात आंघोळ करताना करू नका 'ही' चूक, येईल हार्ट अ‍ॅटॅक, पाहा आंघोळ करण्याची योग्य पद्धत...

Heart Attack Rises In Cold Weather Due To Shower Mistake Doctor Told How To Take Bath Step By Step : Can your shower habit lead to a heart attack in winter : shower habit could lead to a heart attack : थंडीच्या दिवसांत आंघोळ करताना लक्षात ठेवाव्यात अशा काही खास गोष्टी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2024 16:23 IST2024-12-30T15:47:10+5:302024-12-30T16:23:10+5:30

Heart Attack Rises In Cold Weather Due To Shower Mistake Doctor Told How To Take Bath Step By Step : Can your shower habit lead to a heart attack in winter : shower habit could lead to a heart attack : थंडीच्या दिवसांत आंघोळ करताना लक्षात ठेवाव्यात अशा काही खास गोष्टी...

shower habit could lead to a heart attack Heart Attack Rises In Cold Weather Due To Shower Mistake Doctor Told How To Take Bath Step By Step | हिवाळ्यात आंघोळ करताना करू नका 'ही' चूक, येईल हार्ट अ‍ॅटॅक, पाहा आंघोळ करण्याची योग्य पद्धत...

हिवाळ्यात आंघोळ करताना करू नका 'ही' चूक, येईल हार्ट अ‍ॅटॅक, पाहा आंघोळ करण्याची योग्य पद्धत...

'ठंडे, ठंडे पानी से नहाना चाहिये,' या गाण्याच्या ओळींप्रमाणे आपण इतर ऋतूंत गार पाण्याने आंघोळ करू शकतो. परंतु हिवाळा म्हटलं की आपल्याला कडक गरम पाणीच आंघोळीसाठी लागते. हिवाळ्यांत बरेचजण (Heart Attack Rises In Cold Weather Due To Shower Mistake Doctor Told How To Take Bath Step By Step) बहुदा अंघोळीसाठी गरम पाण्याचाच वापर करतात. थंडीच्या दिवसांत वातावरणातील गारठयाने अंघोळीसाठी थंड पाणी वापरणे नकोसे वाटते. यासाठीच आपण शक्यतो (Can your shower habit lead to a heart attack in winter) हिवाळ्यात आंघोळीसाठी गरम पाण्याचा (shower habit could lead to a heart attack) वापर करतो. परंतु असे असली तरीही हिवाळ्यात आंघोळीसाठी गरम पाणी वापरावे की थंड याबाबतीत अनेकांना प्रश्न पडतात. यासोबतच थंडीच्या दिवसांत गारव्याने आपल्याला काहीवेळा आंघोळ करावीशी वाटत देखील नाही.

थंडीच्या दिवसांत थंड पाण्याने आंघोळ केल्यास आपल्याला सर्दी - खोकला, ताप यांसारखे लहानमोठे आजार होऊ शकतात. एवढंच नव्हे तर, थंडीच्या दिवसांत चुकीच्या पद्धतीने आंघोळ करणे देखील तुमच्या जीवावर बेतू शकते. कारण आंघोळ करण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे तुम्हांला नकळतपणे अचानक हार्ट अटॅक देखील येण्याची शक्यता असते. अशावेळी थंडीच्या दिवसांत नेमकी आंघोळ करण्याची योग्य पद्धत कोणती? सोबतच अंघोळीसाठी कोणते पाणी वापरावे याबाबत अधिक माहिती देणारा व्हिडीओ इंस्टाग्राम वरील weshuddhs या अकाऊंटवर डॉ. निशांत गुप्ता यांनी शेअर केला आहे. हिवाळ्यात आंघोळ करण्याची नेमकी योग्य पद्धत कोणती ते पाहूयात.

हिवाळ्यात आंघोळ करण्याची नेमकी योग्य पद्धत कोणती ? 

आंघोळ करताना शक्यतो आपल्यापैकी बरेचजण सगळ्यांत आधी डोक्यावर पाणी ओतून आंघोळीला सुरुवात करतात. परंतु ही सगळ्यात खूप मोठी चूक आहे. थंडीच्या दिवसांत किंवा इतरही ऋतूंमध्ये आपण डोक्यावर पाणी ओतून आंघोळ करतो, यामुळे आपण अनेक लहान मोठ्या आजारांना निमंत्रणच देतो. सोबतच असे केल्याने काहीवेळा हार्ट अ‍ॅटॅक येण्याची देखील शक्यता असते. आंघोळीची सुरुवात करताना डोक्यावर पाणी ओतून आंघोळ केल्याने हार्ट अ‍ॅटॅक  येण्याचा धोका वाढतो. 

डॉ. निशांत गुप्ता यांच्या मते, थंडीत गरम, थंड किंवा कोमट पाण्याने आंघोळ करत असाल तरीही पाणी सगळ्यात आधी डोक्यावर ओतून आंघोळीला सुरुवात करु नका. सर्वातआधी पायांपासून सुरुवात करा. आंघोळ करताना आधी पायांवर पाणी ओता. त्यानंतर पोटावर आणि मग छातीवर अशा क्रमाने पाणी ओतावे. अशा पद्धतींने आंघोळ करताना सगळ्यात शेवटी डोक्यावर पाणी ओतावे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, थंडीत अशा पद्धतीने आंघोळ केल्यास आपल्या शरीराच्या तापमानाचा योग्य पद्धतीने बॅलेन्स राखण्यास मदत होते. ज्या लोकांना कोलेस्टेरॉल, डायबिटीस आहे अशांनी हिवाळ्यात आंघोळ करताना अधिक काळजी घ्यावी. 

हिवाळ्यात हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण अधिक असते . यापैकी अनेक प्रकरणांमध्ये, बाथरूममध्ये हृदयविकाराचा झटका येण्याच्या केसेस अधिक असतात. थंडीच्या दिवसांत चुकीच्या पद्धतीने आंघोळ करणे हे यामागचे सर्वात महत्वाचे कारण असू शकते आणि जवळपास ९० टक्के लोक अशा प्रकारेच आंघोळ करतात.

बाळंतपणात वाढलेलं २३ किलो वजन नेहा धुपियाने चटकन केलं कमी! ते कसं, वाचा...


खूप वर्ष सतत गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यानं स्तनांचा आकार वाढतो का? स्त्रीरोग तज्ज्ञ सांगतात...

थंडीत, आपल्या रक्तवाहिन्या आकसतात आणि हृदयाला रक्त पंप करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. यामुळे हृदयावर ताण पडतो आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. कोलेस्टेरॉलच्या समस्यांमुळे हा धोका आणखी वाढतो.

या ऋतूत आंघोळ करताना ही छोटीशी चूक करणे महागात पडू शकते. डॉक्टर निशांत गुप्ता म्हणतात की गरम पाणी देखील या धोक्यापासून वाचवू शकत नाही. थंड किंवा गरम पाण्याने आंघोळ करा, जर पद्धत योग्य नसेल तर धोका नेहमीच असतो.

Web Title: shower habit could lead to a heart attack Heart Attack Rises In Cold Weather Due To Shower Mistake Doctor Told How To Take Bath Step By Step

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.