Join us   

Shraddha Walkar killing : काय आहे DNA अ‍ॅनालिसिस? हाडांच्या सॅम्पलमधून उलगडणार श्रद्धाच्या हत्येचं रहस्य 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 1:44 PM

Shraddha Walkar killing : कोणताही क्राईम सिन असो हत्या किंवा चोरी पीडित व्यक्ती आणि अपराधी व्यक्तीचे डिएनए कोणत्या कोणत्या स्वरूपत मागे राहतात.

श्रद्धा वालकर हत्या (Shraddha Walkar) प्रकरणात रोज नवीन खुलासे होते आहेत. तपासात आढळेली हाडं श्रद्धांचीच असल्याचं आफताबचं म्हणणं आहे. यावर आता डिएनए एनॅलिसस होणार आहे. श्रद्धाच्या आई वडीलांचे डिएनए सँपल घेण्यात आले आहेत. यावरून ती हाडं श्रद्धाची आहेत की नाही ते पाहिलं जाणार आहे. (what is dna analysis)

कोणताही क्राईम सिन असो हत्या किंवा चोरी पीडित व्यक्ती आणि अपराधी व्यक्तीचे डिएनए कोणत्या कोणत्या स्वरूपत मागे राहतात. आफताबने श्रद्धाला मारून  तिच्या शरीराचे तुकडे केले आणि जंगलात फेकले.  पोलिसांकडून आता हाडांचे डिएनए एनालिसिस करून श्रद्धाच्या आई वडीलांच्या डिएनए सॅम्पलशी जुळवले  जाणार आहे. जेणेकरून ही हाडं  श्रद्धाचीच आहेत  की नाही याचा शोध घेतला जाईल. (Shraddha Walkar killing)

डिएनए सॅम्पल कुठून काढतात?

रक्त, वीर्य, थूंकी, मुत्र, मल, केस, दात डाडं, टिश्यू किंवा पेशींच्या माध्यमातून घेतली जातात. आता तपासादरम्यान सापडलेल्या हाडांचे सॅम्पल घेऊन चाचणी केली जाणार आहे. 

सॅम्पल कसं घेतलं जातं 

कोणत्याही व्यक्तीचे डिएनए सॅम्पल्स मास्क, टोपी, कपडे , मशिन, हत्यार, टुल्स, सेक्शुअल असॉल्ट एविडेंस किट, अंडरगारमेंट्स, गादी, नखं, कप, बॉटल्स, टुथपिक, टुथब्रश, चेहरा पुसून फेकलेला रुमाल, नॅपकीन, कंगवा, चश्मा, कंडोम या माध्यमातून घेतलं जातं.  ज्या ठिकाणाहून काही  मिळण्याची अपेक्षा नसते, अशा ठिकाणी डीएनए सॅम्पल मिळू शकतात.  

डिएन एनॅलिसिस कुठे होतं?

डीएनए एनालिसिस केंद्र सरकारकडून निर्धारित सरकारी फॉरेंसिक लॅब किंवा मान्यता प्राप्त खासगी फोरेंसिक लॅबमधून केली जाते. ही चाचणी फक्त अशाच प्रयोगशाळांमध्ये केली जाते तिथे डिएनए विश्लेषणची सुविधा असते.

टॅग्स : सोशल व्हायरलसोशल मीडिया