Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > हार्ट अटॅकनंतर श्रेयस तळपदेची तातडीने करावी लागली अँजिओप्लास्टी, हा उपचार नक्की असतो काय?

हार्ट अटॅकनंतर श्रेयस तळपदेची तातडीने करावी लागली अँजिओप्लास्टी, हा उपचार नक्की असतो काय?

Shreyas Talpade Suffers Heart Attack : अँजिओप्लास्टी करतात म्हणजे नेमके काय उपचार केले जातात?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 10:31 AM2023-12-15T10:31:20+5:302023-12-15T15:47:57+5:30

Shreyas Talpade Suffers Heart Attack : अँजिओप्लास्टी करतात म्हणजे नेमके काय उपचार केले जातात?

Shreyas Talpade Suffers Heart Attack Undergoes Angioplasty Know What is Angioplasty | हार्ट अटॅकनंतर श्रेयस तळपदेची तातडीने करावी लागली अँजिओप्लास्टी, हा उपचार नक्की असतो काय?

हार्ट अटॅकनंतर श्रेयस तळपदेची तातडीने करावी लागली अँजिओप्लास्टी, हा उपचार नक्की असतो काय?

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदेला (Shreyas Talpade) गुरूवारी हृदयविकाराचा (Heart Attack) झटका आला.  ४७ वर्षीय श्रेयसला  लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. श्रेयसचा येता चित्रपट वेलकम टू द जंगल च्या शुटिंग दरम्यान हृदयविकाराचा झटका येऊन तो बेशुद्ध झाला. अंधेरी पश्चिम मध्ये बेलेव्ह्यू रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले आहे आणि एंजियोप्लास्टी (Angioplasty) करण्यात आली. 

समोर आलेल्या माहितीनुसार  संपूर्ण शुटिंगदरम्यान  श्रेयसची तब्येत बरी होती. त्याने शुटींग दरम्यान सेटवरील इतर कलाकरांबरोबर मजा, मस्करीही केली. शुटींग संपल्यानंतर घरी निघताना त्याने आपल्याला अस्वस्थ वाटत असल्याचे पत्नीला सांगितले. काही वेळातच हृदय विकाराचा झटका आल्यानंतर रुग्णालयात दाखल करून श्रेयसची  एंजियोप्लास्टी करण्यात आली. एंजियोप्लास्टी एक अशी प्रक्रिया आहे ज्यात कोरोनरी आर्टरी डिसीजमुळे ब्लाॉक झालेल्या कोरोनरी आर्टरीज उघडण्याचा प्रयत्न केला जातो.  सध्या श्रेयस रुग्णालयात उपचार घेत आहे. (Shreyas Talpade Suffers Heart Attack Undergoes Angioplasty Know What is Angioplasty)

एंजिओप्लास्टी काय आहे? (What is Angioplasty)

एंजियोप्लास्टी एक अशी क्रिया आहे ज्याचा उपयोग कोरोनरी धमनी रोगांमुळे ब्लॉक झालेल्या धमन्या उघडण्यासाठी केला जातो. एंजिओप्लास्टी ओपन हार्ट सर्जरीशिवाय हृदयाच्या स्नायूंमध्ये रक्त प्रवाह पुनर्संचयित करते.  हृदय विकाराचा झटका येणं यांसारख्या आपातकालीन स्थितीत एंजिओप्लास्टी केली जाते. एंजियोप्लास्टीला परक्यूटेनियस कोरोनरी इंटरवेंशन (PCI) असेही म्हटले जाते.

पोट खूप सुटलंय-धड व्यायामही होत नाही? रोज रिकाम्या पोटी हा पदार्थ घ्या-पोट होईल स्लिम

एंजिओप्लास्टी  कशी करतात?

हे करताना एक लांब, पातळ ट्यूब (कॅथेटर) रक्त वाहिन्यांमध्ये टाकली जाते आणि ब्लॉक आर्टरीज  उघडल्या जातात. कॅथेटरच्या टोकाला एक छोटा फुगा असतो. जेव्हा कॅथेटर एखाद्या ठिकाणी ठेवला जातो तेव्हा धमन्याच्या संकुचित भागात हा फुगा फुगवला जातो. यामुळे धमन्याच्या काठाला असलेले प्लेक किंवा ब्लड क्लॉट दाबले जाते ज्यामुळे रक्तप्रवाह व्यवस्थित होण्यास मदत होते. एंजियोप्लास्टी केल्यानंतर डॉक्टर कॅथेटर बाहेर काढून टाकतात. ते ठिकाण झाकण्यासाठी एका पट्टीचा वापर केला जातो.  यात सर्जिकल प्रक्रियेच्या  तुलनेत कमी जोखिम असते.

एखाद्याला अचानक हार्ट अटॅक आल्यास काय करावे?

१) हृदयविकाराच झटका आल्यानंतर  सगळ्यात आधी इमरजेंसी नंबरवर कॉल करा. जेणेकरून रुग्णवाहिका लगेच उपलब्ध  होईल. 

२)  जोपर्यंत मेडीकल हेल्प मिळत नाही तोपर्यंत एस्पिरिन चावून गिळा. एस्पिरिनमुळे रक्ताच्या गुठळ्या होणं रोखण्यास मदत होईल. हृदयविकाराचा झटका आल्याने  हृदयाची गती कमी होऊ शकते. जर तुम्हाला एलर्जी असेल किंवा डॉक्टरने घेण्यास सांगितले नसेल तर एस्पिरिन घेऊ नका.

थंडीत चेहरा काळवंडला-त्वचा ताणल्यासारखी झाली? मुल्तानी मातीचा १ उपाय, सॉफ्ट-ग्लोईंग दिसेल त्वचा

३)  रुग्ण बेशुद्ध असेल आणि जवळपास ऑटोमेडेटे एक्सटर्नल डिफिब्रिलेटर असेल तर त्यावरील सुचना वाचून याचा वापर करा. 

४) रुग्ण बेशुद्ध असेल तर त्याला सीपीआर देणं सुरू करा. 

५) व्यक्तीच्या छातीच्या मध्यभागी जोरात दाबून हात पुन्हा वर घ्या. वारंवार हे करत राहा, ज्यामुळे रुग्णाला शुद्ध येऊ शकते. 

Web Title: Shreyas Talpade Suffers Heart Attack Undergoes Angioplasty Know What is Angioplasty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.