Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सकाळी रिकाम्या पोटी चहा पिता, चैन पडत नाही? ३ साईड इफेक्ट, तब्येतीवर होईल परीणाम...

सकाळी रिकाम्या पोटी चहा पिता, चैन पडत नाही? ३ साईड इफेक्ट, तब्येतीवर होईल परीणाम...

Side Effect of Drinking Tea On Empty Stomach : चहा घेण्यामुळे आरोग्याला कोणते तोटे होतात याविषयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2023 06:19 PM2023-02-07T18:19:00+5:302023-02-07T18:23:15+5:30

Side Effect of Drinking Tea On Empty Stomach : चहा घेण्यामुळे आरोग्याला कोणते तोटे होतात याविषयी

Side Effect of Drinking Tea On Empty Stomach : Drinking tea on an empty stomach in the morning, not feeling relaxed? 3 side effects, health effects... | सकाळी रिकाम्या पोटी चहा पिता, चैन पडत नाही? ३ साईड इफेक्ट, तब्येतीवर होईल परीणाम...

सकाळी रिकाम्या पोटी चहा पिता, चैन पडत नाही? ३ साईड इफेक्ट, तब्येतीवर होईल परीणाम...

सकाळी उठल्या उठल्या आपण ब्रश करतो आणि सगळ्यात पहिल्यांदा चहा घेतो. चहा घेतल्यावर आपल्याला एकदम तरतरी आल्यासारखं वाटतं. चहा किंवा कॉफी घेतल्यावर आपल्याला एनर्जेटीक वाटतं, पोट साफ व्हायला मदत होते, आळस जातो आणि जाग यायला मदत होते असा अनेकांचा समज असतो. थंडीच्या दिवसांत तर हुडहुडी भरलेली असताना गरम चहा-कॉफी घ्यायला छान वाटते. एकदा चहा घेतला की मग फ्रेश वाटते आणि पुढची कामं झटपट होतात (Side Effect of Drinking Tea On Empty Stomach). 

विशेष म्हणजे चहामध्ये असणाऱ्या साखरेमुळे आपल्याला काही प्रमाणात एनर्जी आल्यासारखे वाटते. तसेच चहा गरम असल्याने तो प्यायल्यावर तरतरी आल्याचाही फिल येतो. पण सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी चहा घेणं आरोग्यासाठी अजिबात चांगलं नसतं. अनेकांसाठी अमृत असलेला चहा आरोग्यासाठी मात्र घातक ठरु शकतो. रिकाम्या पोटी चहा घेतल्यास आरोग्याच्या काही समस्या उद्भवतात. प्रसिद्ध डायटीशियन किरण कुरकेजा चहा घेण्यामुळे आरोग्याला कोणते तोटे होतात याविषयी सांगतात. 

आरोग्यावर होणारे दुष्परिणाम...

१. पोटात जळजळ 

चहामध्ये असणारे आम्ल पोटासाठी हानिकारक असते. यामुळे पोटाच्या आतील अस्तरांना त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे पोटात जळजळ झाल्यासारखे किंवा अस्वस्थ होते. 


२. ऍसिड रिफ्लक्स

आपल्या शरीरात विविध प्रकारच्या रासायनिक प्रक्रिया सुरू असतात. रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने पोटात अॅसिडचे उत्पादन वाढू शकते, ज्यामुळे ऍसिड रिफ्लक्स किंवा छातीत जळजळ होऊ शकते. यालाच आपण अॅसिडीटीचा त्रास झाला असेही म्हणतो. चहा हे अॅसिडीटी वाढण्याचे एक महत्त्वाचे कारण असते. 

३. डीहायड्रेशन 

अनेक जण दूध न घालता लेमन टी, ब्लॅक टी असे घेतात. अशाप्रकारचा चहा हा कॅफिनयुक्त असतो. त्यामुळे लघवीचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. असे झाल्यास शरीरातील पाणी जास्त प्रमाणात शरीराबाहेर पडते आणि शरीराचे निर्जलीकरण होण्याची शक्यता असते. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाली तर आरोग्याच्या विविध समस्या उद्भवू शकतात. 

याव्यतिरिक्त, चहामध्ये टॅनिन असते जे रिकाम्या पोटी सेवन केल्यावर शरीरातील लोह आणि इतर खनिजांच्या शोषणात व्यत्यय येऊ शकतो. 

Web Title: Side Effect of Drinking Tea On Empty Stomach : Drinking tea on an empty stomach in the morning, not feeling relaxed? 3 side effects, health effects...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.