Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > घरात दररोज धूप- उदबत्ती लावणंही जीवावर बेतू शकतं? बघा संशोधन काय सांगतं....

घरात दररोज धूप- उदबत्ती लावणंही जीवावर बेतू शकतं? बघा संशोधन काय सांगतं....

Side Effects Of Burning Incense Or Dhoop Agarbatti At Home: तुम्हीही सकाळ- संध्याकाळ घरात नित्यनेमाने उदबत्ती, धूप लावत असाल तर एकदा याविषयीचा अभ्यास काय सांगतो पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2024 01:12 PM2024-06-03T13:12:46+5:302024-06-03T15:26:41+5:30

Side Effects Of Burning Incense Or Dhoop Agarbatti At Home: तुम्हीही सकाळ- संध्याकाळ घरात नित्यनेमाने उदबत्ती, धूप लावत असाल तर एकदा याविषयीचा अभ्यास काय सांगतो पाहा...

side effects of burning incense or dhoop agarbatti at home, burning dhoop agarbatti may increases risk of lung cancer | घरात दररोज धूप- उदबत्ती लावणंही जीवावर बेतू शकतं? बघा संशोधन काय सांगतं....

घरात दररोज धूप- उदबत्ती लावणंही जीवावर बेतू शकतं? बघा संशोधन काय सांगतं....

Highlightsउदबत्ती किंवा धुपाच्या धुरामध्ये जास्त वेळ बसणं टाळा. जर तुमच्या घरात कॅन्सर पेशंट असतील तर घरात धूप किंवा उदबत्ती लावणे पुर्णपणे टाळा.

आपल्याकडे बहुतांश घरांमध्ये एक गोष्ट नियमितपणे केली जाते. ती म्हणजे सकाळ, संध्याकाळ घरात उदबत्ती किंवा धूप लावणे. धूप किंवा उदबत्ती जोपर्यंत लावत नाही, तोपर्यंत फ्रेश, प्रसन्न वाटत नाही. घरात उदबत्ती लावली की घरातही कसं सुगंधित आणि सकारात्मक वाटू लागतं अशी अनेकांची भावना असते. पण हेच आपण अगदी आवडीने आणि उत्साहाने करत असलेलं काम आपल्या आरोग्यासाठी मात्र धोकादायक ठरू शकतं, असा एक अभ्यास सांगतो आहे. त्यात असं नमूद करण्यात आलं आहे की घरात नियमितपणे धूप किंवा उदबत्ती लावत असाल तर त्यामुळे तुम्हाला कर्करोग म्हणजेच कॅन्सर होण्याचा धोका कित्येक पटीने वाढतो (Burning dhoop agarbatti may increases risk of lung cancer). याविषयीच्या बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी या संशोधनात सांगण्यात आलेल्या आहेत. त्या नेमक्या कोणत्या ते पाहा...

 

घरात नियमितपणे धूप किंवा अगरबत्ती, उदबत्ती लावणं कसं आणि किती धोकादायक आहे, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ prevailovercancer या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

मुलांना शाळेसाठी स्टीलची, कमी वजनाची, भरपूर पाणी मावणारी बाटली घ्यायची? बघा ३ पर्याय

यामध्ये ते सांगतात की अनेक अभ्यासांमधून जो निष्कर्ष काढण्यात आला आहे त्यावरून असं दिसून येतं की घरात जेव्हा आपण धूप, उदबत्ती लावतो तेव्हा त्यातून PAHs (polycyclic aromatic hydrocarbons) हे विषारी केमिकल्स बाहेर पडतात. तसेच धूप किंवा उदबत्त्यांमध्ये असणारे Auramine O यासारखे काही घटक कॅन्सर स्टेम सेलला ॲक्टीव्हेट करतात आणि त्यामुळे मग फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचे प्रमाण खूप वाढते. 

 

आणखी एक अभ्यास असंही सांगतो की धुम्रपान केल्याने आणि धूप, अगरबत्ती घरात लावल्याने कर्करोगाचा धोका सारख्याच प्रमाणात वाढतो. त्यामुळे कधीही बंद घरात किंवा खोलीत उदबत्ती लावू नका.

वजन कधीच वाढणार नाही, म्हातारे झालात तरी हृदय- फुफ्फुस ठणठणीत राहील- फक्त १ काम करा...

उदबत्ती लावायचीच असेल तर मोकळ्या हवेत किंवा हवेशीर ठिकाणी लावा. उदबत्ती किंवा धुपाच्या धुरामध्ये जास्त वेळ बसणं टाळा. जर तुमच्या घरात कॅन्सर पेशंट असतील तर घरात धूप किंवा उदबत्ती लावणे पुर्णपणे टाळा. 


 

Web Title: side effects of burning incense or dhoop agarbatti at home, burning dhoop agarbatti may increases risk of lung cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.