पावसाळ्याच्या दिवसांत घरोघरी डासांचं प्रमाण खूप वाढतं. आपल्या आजुबाजुला डास वाढले की मग डासांपासून पसरणारे आजार होण्याचा धोकाही वाढतोच. त्यामुळे मग सुरक्षिततेचा एक उपाय म्हणून आपण आपल्या घरात डासांना पळवून लावणाऱ्या मशिनचा वापर करतो. हे मशिन जर तुम्ही योग्य प्रमाणात वापरलं तर ठिक. पण त्याचा जर अतिरेक होत असेल तर तो मात्र तुमच्या तब्येतीसाठी धोकादायक ठरू शकतो (side effects of constant use of mosquito liquid repellent machine). बघा याविषयी तज्ज्ञ नेमकं काय सांगत आहेत.. (proper method of using mosquito liquid repellent machine)
डास पळवून लावण्यासाठी तुम्हीही मशिनचा वापर करता का?
डासांना पळवून लावण्यासाठी तुम्हीही लिक्विड असणाऱ्या मशिनचा सतत वापर करत असाल तर त्यामुळे आरोग्यावर कसा परिणाम होऊ शकतो, याविषयी डॉ. इमरान अहमद यांनी दिलेली माहिती झीन्यूजने प्रकाशित केली आहे.
आहारतज्ज्ञ सांगतात ड्रायफ्रुट्स खाण्याआधी 'ही' गोष्ट करा- अन्यथा तब्येत बिघडण्याचा धोका
त्यामध्ये डॉक्टर असं सांगत आहेत की त्या मशिनमध्ये जे लिक्विड असतं त्यामध्ये प्रलैथ्रीन, एलेथ्रीन असे केमिकल्स असतात. हे केमिकल्स श्वसनाद्वारे जर जास्त प्रमाणात आपल्या शरीरात गेले तर त्यामुळे श्वसन संस्थेवर परिणाम होतो आणि श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. अस्थमा, दमा असणाऱ्या व्यक्तींसाठी तर ते जास्तच त्रासदायक ठरू शकतं.
या लिक्विडमध्ये असणाऱ्या घटकांमुळे डोळ्यांवरही परिणाम होऊ शकतो. डोळे लाल होणं, डोळ्यांवर सूज येणं, खाज येणं असा त्रास काही जणांना जाणवतो.
जर तुमची खोली पुर्णपणे बंद असेल आणि त्यात जर तुम्ही सतत लिक्विड मशिन लावून ठेवलं तर त्यामुळे डोकेदुखीचा त्रासही होऊ शकतो.
जया किशोरी सांगतात मुलांना फक्त 'ही' गोष्ट सांगा, ते तुमच्यापासून कोणतीच गोष्ट लपविणार नाहीत
डास पळविणाऱ्या मशिनचा योग्य वापर करण्याची पद्धत
तज्ज्ञ असं सांगतात की हे मशिन रात्रभर लावून कधीच झोपू नये. तुम्ही सुरुवातीचे फक्त अर्धा ते एक तास हे मशिन चालू ठेवा. यामुळे खोलीतल्या डासांचं प्रमाण निश्चितच कमी होेऊन जातं. त्यानंतर हे मशिन बंद करून टाका. नंतर पुन्हा गरज वाटली तर थोडा वेळ ते लावा. पण सलग काही तासांसाठी हे मशिन अजिबात लावून ठेवू नका.