पाणी आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कोमट पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. यामुळे पचनक्रिया, रक्ताभिसरण सुरळीत होतं आणि तणावही कमी होतो. जास्त गरम पाणी प्यायल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण बिघडते. खूप गरम पाणी प्यायल्यास तुमची झोपेची पद्धतही बिघडू शकते.
जास्त प्रमाणात गरम पाणी प्यायल्याने किडनीवर वाईट परिणाम होतो. वारंवार गरम पाणी प्यायल्याने अंतर्गत जळजळ होऊ शकते. गरम पाणी पिण्याचे फायदे यावर अनेक रिसर्च केले गेले आहेत. गरम पाणी पिण्यामुळे भाजण्याचा धोका आहे. जीभ किंवा घसा भाजू शकते. एखाद्या व्यक्तीने उकळलेलं पाणी पिणे लगेच पिणं टाळावं. गरम पाणी पिण्यापूर्वी एक छोटासा घोट घ्यावा.
कॉफी किंवा चहासारखी गरम पेये अनेकदा उकळत्या तापमानात दिली जातात. गरम पाण्याचे फायदे मिळविण्यासाठी एखाद्याला भाजण्याचा धोका पत्करण्याची गरज नाही. ज्या लोकांना गरम पाणी आवडत नाही. त्यांनी शरीराच्या तापमानावर किंवा किंचित जास्त तापमानावर पाणी पिण्याचा विचार केला पाहिजे. २००८ च्या अभ्यासानुसार कॉफी पिण्यासाठी सर्वोत्तम तापमान १३६°F (५७.८ °C) आहे.
हे तापमान भाजण्याचा धोका कमी करतं, परंतु तरीही गरम पेयाची सुखद अनुभूती देतं. हायड्रेटेड राहणं आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, मात्र पाणी पिताना नेमकं किती तापमान असावं यावर ठोस उत्तर नाही. काही लोकांचं असं म्हणणं आहे की, थंड पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक आहे.