बरेच लोकांना रोजच्या जेवणात दही लागते (Curd and Sugar). दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. दही नुसतं न खाण्याचा दिला जातो. दह्यामध्ये भाज्या, मीठ किंवा साखर घालून आपण खातो (Health). काही जण दह्यामध्ये साखर घालून खातात. पण दह्यामध्ये साखर घालून खावे का? जास्त साखरेचे सेवन केल्याने कॅलरीजचे वाढू शकतात (Side Effects). ज्यामुळे वजन वाढण्याचाही धोका वाढतो.
लठ्ठपणामुळे गंभीर आजारांचा धोकाही वाढतो. यासह पोटाचे विकारही छळतात. जर आपल्याला वेट लॉस करायचं असेल तर, साखरेऐवजी गुळ पावडर किंवा ब्राऊन शुगरचा वापर करा. पण दररोज दह्यासोबत साखर खाल्ल्याने आरोग्याला कोणती हानी पोहचू शकते? दह्यासोबत साखर का खाऊ नये? पाहा(Side effects of eating curd and sugar everyday).
दह्यात साखर मिसळून खाण्याचे दुष्परिणाम
वजन वाढणे
दररोज दह्यासोबत साखर खाल्ल्याने वजन वाढू शकते. साखरेमध्ये जास्त कॅलरीज असल्यामुळे वजन भरभर वाढते. वाढत्या लठ्ठपणामुळे इतरही अनेक आजार होऊ शकतात. त्यामुळे साखरेचे प्रमाण आहारात कमी प्रमाणात करा.
पावसाळ्यात दही खावं? कधी खावं सकाळी की रात्री? सर्दी-खोकला होण्याची भीती वाटते?
मधुमेहाचा धोका
जास्त प्रमाणात साखरेचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. ज्यामुळे टाईप २ मधुमेह होण्याचा धोका वाढतो. दह्यामध्ये नैसर्गिकरित्या लॅक्टोज असते. जे एक प्रकारचे साखरच आहे. याशिवाय जर आपण दह्यामध्ये साखर घालत असाल तर, रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.
हृदयरोगाचा धोका वाढतो
जास्त प्रमाणात साखरेचे सेवन केल्याने रक्तातील ट्रायग्लिसराइड्स आणि इतर हानिकारक चरबीचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
दात किडणे
साखर हा बॅक्टेरियाचा प्रमुख स्त्रोत आहे. जे अॅसिड तयार करतात. ज्यामुळे दात खराब होऊ शकतात. दातांमध्ये पोकळी आणि इतर दातांच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
बॅड कोलेस्टेरॉल कमी करणारा कोमट पाण्याचा १ सोपा उपाय; पाण्यात चिमुटभर 'ही' गोष्ट मिसळा
पचन समस्या
साखरेचे अधिक प्रमाणात सेवन केल्याने पोटाचे विकार वाढू शकतात. अॅसिडिटी, गॅसेस यासह बद्धकोष्ठताचीही समस्या निर्माण होऊ शकते.