Join us   

सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी मोबाईल पाहता? डोळे जातील आणि तब्येतीवर होतील ३ वाईट परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2024 9:05 AM

Health Tips: ९० टक्के लोक असे आहेत की जे सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी मोबाईल पाहतात. तुम्हीही असंच करत असाल तर बघा त्याचे डोळ्यांवर, तब्येतीवर काय परिणाम होऊ शकतात.. (side effects of looking in mobile phone immediately after waking up)

ठळक मुद्दे सकाळी उठल्यानंतर डोळे उघडताच माेबाईल हातात घेऊन बसत असाल तर त्याचे तुमच्या डोळ्यांवर आणि आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतात ते पाहा..

मोबाईल हे आता आपल्या प्रत्येकाच्याच हातातलं खेळणं झालं आहे. लहान मुलांना आपण अतिमोबाईल पाहतात म्हणून ओरडतो. पण बऱ्याचदा मोठी माणसंही गरज नसताना मोबाईल हातात घेतात आणि सोशल मिडियाच्या जादुई दुनियेत हरवून जातात. अगदी सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत मोबाईल अनेकांच्या हातात असतोच. दिवसाची सुरुवातच मोबाईल पाहून होते, असं म्हटल्यास वावगं होणार नाही. पण असं सकाळी उठल्यानंतर डोळे उघडताच माेबाईल हातात घेऊन बसत असाल तर त्याचे तुमच्या डोळ्यांवर आणि आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतात ते पाहा.. (side effects of looking in mobile phone immediately after waking up)

 

सकाळी उठताच मोबाईल बघण्याचे दुष्परिणाम

१. सकाळी उठल्यावर जेव्हा आपण डोळे उघडतो, तेव्हा आपले डोळे खोलीतल्या नैसर्गिक उजेडामुळेही थोडे किलकिले होतात. त्यांना खोलीतला तो मंद प्रकाशही नकोसा वाटतो.

पावसाळ्यात एक्झॉस्ट फॅन, किचनच्या टाईल्स खूपच चिकट होतात? पाहा तेलकटपणा घालविण्याचा सोपा उपाय 

अशावेळी आपण आपल्या डोळ्यांना मोबाईलचा एकदम प्रखर उजेड दाखवतो. यामुळे डोळ्यांवर खूप ताण येतो. बऱ्याचदा तर आपण स्वत:ही तो अनुभव घेतो. मोबाईलचा उजेड पडताच डोळे एकदम मिटले जातात..

 

२. डॉ. ज्योती कपूर यांनी healthshots.com ला दिलेल्या माहितीनुसार जर सकाळी उठताच मोबाईलचे नोटिफिकेशन्स पाहात बसलं तर दिवसाची सुरुवात अतिशय स्ट्रेसफूल होते. त्याचा परिणाम तुमच्या दिवसभराच्या कामांवर होतो.

दुधी भोपळ्याची भाजी आवडत नाही? मग कुरकुरीत डोसे करा- बघा नाश्त्यासाठी चवदार रेसिपी 

३. ७ ते ८ तासांच्या झोपेनंतर ज्याप्रमाणे तुमच्या शरीराला एका लयीत यायला वेळ लागतो. उठल्या उठल्या तुम्ही लगेच भराभर कामं करू शकत नाही. तसाच वेळ तुमच्या मेंदूलाही लागतो. पण माेबाईल पाहात बसल्याने तुमच्या मेंदूला तो वेळ मिळत नाही आणि त्याच्यावर ताण येतो.

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सडोळ्यांची निगामोबाइल