Join us   

सुटीच्या दिवशी तासंतास उशिरापर्यंत झोपता, आळसात लोळता? हार्टच नाही मेंदूसाठीही ही सवय घातक कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2023 9:23 AM

Side Effects of Oversleeping on Weekend : साधारणपणे ३ पैकी १ व्यक्ती आपली झोप पूर्ण करु शकत नाहीत

झोप ही अनेकांना अतिशय प्रिय असलेली गोष्ट. कोणत्याही प्रहरी, कोणत्याही जागेवर झोपू शकतील असे अनेक लोक आपल्या आजुबाजूला असतात. पण कधी ऑफीसच्या कामामुळे, कधी घरातील कामांमुळे तर काही वेळा आणखी काही कारणांनी आपली झोप पूर्ण होत नाही. रात्रीची किमान ८ तासांची झोप पूर्ण झाली की आपला दिवस चांगला जातो. पण हीच झोप पूर्ण झाली नाही तर मात्र पुढचा पूर्ण दिवस आळसात जातो. आठवड्याच्या दिवशी तर आपल्याला ऑफीस आणि इतर कामं असल्याने सकाळी वेळेत उठावेच लागते. इतकेच नाही तर रात्रीच्या वेळीही काही ना काही कारणाने झोपायला उशीर होतो. अशावेळी आपण विकेंडला उशीरा उठण्याचा किंवा दिवसभर झोपून काढण्याचा विचार करतो (Side Effects of Oversleeping on Weekend). 

(Image : Google)

शरीर आणि मन थकलेले असल्याने आपल्याला असा आराम करावासा वाटतो किंवा आराम करण्याची इच्छा होते. अनेकदा आपण विकेंडला इतर कोणताही प्लॅन न करता घरात राहून आराम करण्याचा विचार करतो. मात्र असे करणे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले नसते. प्रमाणापेक्षा जास्त झोपल्याने हृदयाशी निगडीत विविध तक्रारी उद्भवतात. साधारणपणे ३ पैकी १ व्यक्ती आपली झोप पूर्ण करु शकत नाहीत असे काही संशोधनातून समोर आले आहे. पूर्ण आठवडाभर कमी झोपायचे आणि एकदाच विकेंडला जास्त झोप काढायची यामुळे विविध प्रकारच्या समस्या निर्माण होतात. 

(Image : Google)

एरवी झोप पूर्ण न झाल्याने त्याचा आपल्या कामावरही विपरीत परीणाम होतो. ज्या लोकांची झोप पूर्ण होत नाही, जे खूप घोरतात किंवा जे खूप जागरणं करुन जंक फूड जास्त प्रमाणात खातात अशा लोकांचे हार्ट फेल होण्याची शक्यता जास्त असते. अशाप्रकारे विकेंडला झोप पूर्ण करणाऱ्या लोकांची संख्या ५६ टक्के आहे. एरवी रात्रीची ८ ते ९ तास झोप पूर्ण झाल्यावर हार्टच्या समस्यांपासून दूर राहण्याची शक्यता असते. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल