Join us   

टोमॅटो सॉस खाण्याचे ५ दुष्परिणाम, वजन तर वाढेल, सोबत मधुमेहही होण्याचा धोका अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2023 3:47 PM

Side Effects of Tomato Sauce - Why You Shouldn't Eat Too टोमॅटो केचअपचे शौकीन आहात? अतिसेवन आरोग्यासाठी ठरू शकते घातक..

स्नॅक्स किंवा पराठा खाताना तोंडी लावण्यासाठी आपण टोमॅटो सॉस घेतो. टोमॅटो सॉस अनेकांना आवडतो. बरं, यात तुमचा काही दोष नाही. कारण टोमॅटो सॉस हा चवीला इतका रुचकर आणि चविष्ट लागतो की, कोणालाही आवडेल. अनेकांना तर चपातीसोबत टोमॅटो सॉस खाल्ल्याशिवाय जमत नाही. मात्र, याचे अतिसेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकते. टोमॅटो सॉसचे अतिसेवन केल्याने वजन तर वाढतेच, सोबत अ‍ॅसिडिटी आणि यकृताच्या संबंधित समस्या छळू शकतात.

टोमॅटो सॉसचे अतिसेवन का करू नये, जर केलं तर आरोग्याच्या निगडीत कोणते समस्या उद्भवू शकतात, याची माहिती डायट मंत्रा क्लिनिकचे आहारतज्ज्ञ कामिनी सिन्हा यांनी दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, 'बाजारातील टोमॅटो केचअपमध्ये प्रिझर्व्हेटिव्ह आणि रसायने मिसळली जातात. ज्यामुळे आरोग्याचे खूप नुकसान होते. वजन तर वाढतेच, यासह इतर आजारही छळतात'(Side Effects of Tomato Sauce - Why You Shouldn't Eat Too).

बाजारातील टोमॅटो सॉस कशा पद्धतीने तयार केले जाते?

डायटीशियन कामिनी सिन्हा सांगतात, 'केचअप लवकर खराब होऊ नये म्हणून, त्यात भरपूर प्रिझर्व्हेटिव्ह्जचा वापर केला जातो. याशिवाय त्यात केमिकलयुक्त रंग मिसळले जाते, जेणेकरून ते दिसायला आकर्षक दिसतात. यासह त्याची कन्सिटेंसी राखण्यासाठी स्टार्चचाही वापर केला जातो. टोमॅटो सॉस करण्यासाठी कंपनी सडलेल्या टोमॅटोचा देखील वापर करतात. जे प्रत्येक वयोगटाच्या लोकांसाठी हानिकारक ठरू शकते.'

शरीरात मिठाचे वाढते प्रमाण

जर आपण दररोज एक चमचा (५ ग्रॅम) टोमॅटो सॉस खात असाल तर, शरीरात मिठाचे प्रमाण वाढू शकते. कारण टोमॅटो केचअप तयार करण्यासाठी त्यात भरपूर मीठ टाकले जाते. त्यात साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे मिठाची चव आपल्याला जाणवत नाही.

ब्रेकफास्ट कधी करावा? लंच आणि डिनरमध्ये किती तासाचं अंतर असावं? होमिओपॅथिक डॉक्टर सांगतात..

सडलेल्या टोमॅटोचा वापर

अनेकदा टोमॅटो सॉस तयार करण्यासाठी, फ्रेश टोमॅटोसह कुजलेल्या टोमॅटोचा देखील वापर करण्यात येतो. जे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

लठ्ठपणाचा धोका

आहारतज्ज्ञांच्या मते, केचअप तयार करताना त्यात स्टार्चंचा वापर जास्त होतो. कारण स्टार्चमुळे केचअप दीर्घकाळ टिकते. परंतु, स्टार्चमुळे शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढू शकते.  तसेच साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे वजन वाढतेच.

वजन वाढेल, पोट सुटेल म्हणून दही भात खाणं सोडू नका, एक वाटी दही भात खाण्याचे ४ जबरदस्त फायदे पाहा

मधुमेह होण्याचा धोका

टोमॅटो केचअप तयार करण्यासाठी मीठासोबत भरपूर प्रमणात साखरही वापरली जाते. शरीरातील साखरेचे प्रमाण वाढले की, मधुमेहाचा धोका वाढतो. तसेच त्यात स्टार्च आणि सोडियमचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे ब्लड शुगरवरही परिणाम होतो.

पोटांचे विकार

आहारतज्ज्ञ सांगतात, 'टोमॅटो केचअप जास्त प्रमाणात खात असाल तर, शरीरातील सायट्रिक अॅसिडचे प्रमाण वाढते. शरीरात सायट्रिक अॅसिडचा दाब वाढल्याने गॅस्ट्रिकचा त्रास होतो. यामुळे पोटाच्या निगडीत त्रास होण्याचा धोका वाढतो.

पुऱ्या टम्म फुगत नाहीत, फार तेल पितात? पीठ भिजवताना घाला १ पांढरी सिक्रेट गोष्ट

आहारतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, 'बाजारात उपलब्ध असलेल्या टोमॅटो केचअपमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे टोमॅटो केचअप घरीच तयार करून खाणे उत्तम ठरू शकते. जेणेकरुन आपले आरोग्य निरोगी राहील.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यअन्नवेट लॉस टिप्समधुमेह