भारतात चुकीच्या आहाराच्या सवयींमुळे किडनीच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो आणि हळूहळू हा महत्त्वाचा अवयव कमकुवत होऊ लागतो आणि शेवटी काम करणे बंद होते. किडनी निकामी झाल्यामुळे लघवीचा रंग बदलतो आणि हे शारीरिक मूत्रपिंड निकामी होण्याचे हे प्रमुख लक्षण आहे. याशिवाय किडनी निकामी होण्याची इतरही अनेक धोक्याची चिन्हे आहेत. (kidney failure symptoms by seeing urine colour early warning sign)
किडनी खराब होण्याची सुरूवातीची लक्षणं (Early stage kidney disease symptoms)
मद्यपान, उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा काही औषधे घेतल्यास किडनी निकामी होऊ शकते. किडनीच्या आजाराची लक्षणे अनेकदा अवयवाचं जास्त नुकसान झाल्यानंतर दिसतात. काही समस्या त्याची प्रारंभिक लक्षणे म्हणून दिसू शकतात. कमी लघवी, पाणी भरल्याने सांधेदुखी, दम लागणे इ....
किडनी फेल्यूअरची लक्षणं (kidney failure symptoms)
डोकेदुखी होणे
अंगावर खाज सुटणे,
दिवसभर थकवा,
रात्री झोपण्यास त्रास होणे,
नसांना चिकटलेल्या घातक कोलेस्ट्रॉलला बाहेर काढतील ५ फळं; रोज खा, गंभीर आजारांपासून लांब राहाल
वजन कमी होणे किंवा भूक न लागणे,
शारीरिक कमकुवतपणा,
स्मरणशक्ती कमी होणे,
लघवीच्या रंगातील बदल
या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करण्याची चूक करू नका, हे किडनी निकामी होण्याचे मोठे लक्षण असू शकते. अशा स्थितीत डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधा.
मुत्राच्या रंगातील बदल काय दर्शवतो
१) स्वच्छ किंवा फिकट पिवळा रंग - शरीर चांगले हायड्रेटेड आहे
२) गडद पिवळा रंग - शरीरात पाण्याची कमतरता म्हणजेच डिहायड्रेशन झालं आहे.
३) केशरी रंग - शरीरात पाण्याची तीव्र कमतरता किंवा रक्तातील पित्ताचे लक्षण
जेवल्यानंतर लगेच पाणी पिता? डायबिटीस-बीपीचा त्रास होण्यापूर्वीच जाणून घ्या पाणी पिण्याची योग्य वेळ
४) गुलाबी किंवा लाल रंग - लघवीतील रक्तामुळे किंवा स्ट्रॉबेरी आणि बीटरूट सारखे पदार्थ खाल्ल्यामुळे
५) लघवीतील फेस - लघवीतील प्रथिनांचे लक्षण आणि किडनी निकामी सारख्या किडनीच्या आजाराचे लक्षण