आपल्या शरीरात प्रत्येक अवयव महत्वाचे आहे (Health Tips). ज्यात लिव्हरची देखील भूमिका महत्वाची ठरते (Liver Damage). लिव्हर आपल्या शरीरातील घाण आणि विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत करते. यासह, उर्जा स्टोअर करण्यापासून, अन्न पचवणाऱ्या बाइल प्रोटीन आणि रेड ब्लड सेल्सची देखील निर्मिती करते.
लिव्हरला हेल्दी ठेवणं गरजेचं आहे. परंतु, बिघडलेली जीवनशैली आणि सकस आहार न घेतल्यामुळे लिव्हर डॅमेज होऊ शकते. पण लिव्हर डॅमेजची लक्षणं कोणती? लिव्हर डॅमेज होण्याआधी शरीर कोणते संकेत देते? लिव्हर डॅमेज झाल्यावर कोणते उपाय करावे? पाहूयात(Signs and symptoms of liver damage).
लिव्हर डॅमेज झाल्यावर शरीर कोणते संकेत देते?
मळमळ आणि उलटी
द हेल्थ साईट. कॉम या वेबसाईटनुसार, जर आपल्याला वारंवार मळमळ आणि उलटीचा त्रास होत असेल तर, हे लिव्हर डॅमेजचे लक्षण असू शकतं. अनेकदा लोक गॅसची समस्या समजून त्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करतात. जर आपल्याला बऱ्याच काळापासून अशी लक्षणे जाणवत असतील तर, ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.
जिने चढताना-चालताना दम लागतो? जीवनशैलीत करा ४ सोपे बदल; पन्नाशीनंतरही राहाल फिट
थकवा
कामाच्या व्यापामुळे थकवा येणं कॉमन आहे. पण जर वारंवार थकवा जाणवत असेल तर, हे यकृत खराब होण्याचे लक्षण असू शकते. योग्य खाणे आणि पुरेशी विश्रांती घेऊनही आपल्याला थकवा जाणवत असेल तर, आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच उपचार घ्यावा.
पोटाच्या आकारात वाढ
जुनाट लिव्हर रोगामुळे पोटाच्या आकारात बदल दिसू शकते. लिव्हरमध्ये घाण आणि पोटात द्रव्य साठल्यामुळे पोटाच्या आकारामध्ये वाढ होते. जर आपले पोट कोणत्याही कारणाशिवाय वाढत असेल तर, ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.
त्वचेवर खाज सुटणे
त्वचेवर खाज सुटणे हे देखील यकृत खराब झाल्याचे लक्षण असू शकते. यकृतातील पित्ताचे प्रमाण वाढल्यामुळे त्वचेला खूप खाज सुटू लागते. त्यामुळे जर आपल्या स्किनला वारंवार खाज सुटत असेल तर, तज्ज्ञांचा जरूर सल्ला घ्यावा.
पायांना सूज येणे
विनाकारण पायांना वारंवार सूज येत असेल तर, हे लिव्हर डॅमेजटचं लक्षण असू शकते. यकृत खराब झाल्यामुळे, पायांमध्ये द्रव साठतो, ज्यामुळे पाय आणि घोट्याला सूज येते. कोणत्याही करणाशिवाय जर आपले पायांना सूज येत असेल तर, ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.