Join us   

हाडं कमजोर- नजर धूसर झाली? व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता आहे, शरीर देते ४ संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2024 5:40 PM

Signs and Symptoms of Vitamin B12 Deficiency : शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता आहे हे कसं कळणार? वेळीच लक्ष द्या अन्यथा..

मानवाच्या शरीराला कार्य करण्यासाठी अनेक पोषक तत्वांची गरज असते (Vitamin B12). शरीरातील खनिजे आणि पोषक तत्वे कमी झाल्यास समतोल बिघडतो आणि व्यक्ती आजारी पडतो (health tips). त्यामुळे योग्य आहाराचे सेवन करायला हवे. आपल्याला शरीराला व्हिटॅमिन बी १२ ची देखील गरज असते, हे शरीरासाठी महत्वाचे पोषक तत्व आहे (Bone health). यामुळे शरीराला बराच फायदा होतो.

हाडं, मेंदू आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी हे खूप महत्वाचे आहे. जेव्हा शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता भासते, तेव्हा सिस्टम्स आणि ऑर्गन्सवर देखील परिणाम करते. ज्यामुळे गंभीर आजारांचा धोका वाढतो. नजर धूसर ते हाडं कमकुवत होणे यासह इतर समस्या निर्माण होतात. शरीरात व्हिटॅमिन बी १२ची कमतरता भासल्यावर नक्की शरीरात कोणते बदल दिसून येतात पाहूयात(Signs and Symptoms of Vitamin B12 Deficiency).

व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची लक्षणं कोणती?

अशक्तपणा

द हेल्थ साईट. कॉम या वेबसाईटनुसार, शरीरातील रक्तपेशी किंवा प्लेटलेट्स तयार करण्यात व्हिटॅमिन बी १२ महत्वाची भूमिका बजावतात. जेव्हा शरीरात व्हिटॅमिन बी १२ची कमतरता भासते, तेव्हा प्लेटलेटची संख्या कमी होते आणि त्यामुळे ॲनिमिया सारखी परिस्थिती उद्भवते.

हिरड्यातून रक्त - सतत दात दुखतात? ५ प्रकारच्या भाज्या अजिबात खाऊ नका; दात होतील कमकुवत

हाडं कमकुवत

व्हिटॅमिन बी १२च्या कमतरतेमुळे हाडांच्या निगडीत आजार उद्भवू शकतात. शिवाय ऑस्टियोपोरोसिस सारख्या हाडांच्या आजारांचा धोकाही वाढतो. ज्यामुळे हाडं कमकुवत होतात.

दृष्टी धूसर

जेव्हा शरीराला व्हिटॅमिन बी १२ आहारातून पुरेशा प्रमाणात मिळत नाही, तेव्हा ऑप्टिक नर्व्हला देखील नुकसान पोहोचवते. यामुळे दृष्टी धूसर होऊ शकते. आपल्याला स्पष्टपणे दिसण्यात अडचण निर्माण होऊ शकते.

त्वचेच्या निगडीत समस्या

कोरडी त्वचा, हायपरपिग्मेंटेशन, त्वचारोगाची लक्षणे आणि त्वचेवर वारंवार खाज येणे यासारख्या समस्या व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेशी संबंधित असू शकतात.

रोज खा ४ पैकी १ पदार्थ, चष्मा लागणार नाही-डोळ्यांचा नंबर वाढण्यापूर्वी व्हा जाग

व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरता जाणवल्यास कोणते पदार्थ खावेत?

दूध, दही, चीज, पनीर, पालक, बीटरूट आणि मशरूम आपण खाऊ शकता.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य