Join us   

शरीरात बॅड कोलेस्टेरॉल वाढताच चेहऱ्यात दिसतात ४ बदल; लक्ष न दिल्यास जीवाला धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 12:44 PM

Signs of high cholesterol on face : कोलेस्टेरॉल वाढल्यानंतर चेहऱ्यावर काही लक्षणं दिसतात. ज्याद्वारे तुम्हाला कोलेस्टेरॉल वाढल्याचे संकेत मिळू शकतात.

शरीरातलं कोलेस्टेरॉल वाढलं की काही ठराविक लक्षणं दिसतात.एलडीएल (लो डेंसिटी लिपोप्रोटीन)आणि चांगलं आणि एचडीएल ला (हाई डेंसिटी लिपोप्रोटीन) खराब कोलेस्टेरॉल म्हटलं जातं. (Signs of high cholesterol on face) एलडीएलला गुड कोलेस्टेरॉल असं म्हणतात. कोलेस्टेरॉल वाढल्यानंतर चेहऱ्यावर काही लक्षणं दिसतात. ज्याद्वारे तुम्हाला कोलेस्टेरॉल वाढल्याचे संकेत मिळू शकतात. (How to control cholesterol level) 

नॅशनल हार्ट लंग अँड ब्लड इन्स्टिट्यूट (NHLBI) ने शिफारस केली आहे की 45 ते 65 वयोगटातील पुरुष आणि 55 ते 64 वयोगटातील महिलांनी दर एक ते दोन वर्षांनी रक्त तपासणी करावी. तुमचे वय ६५ पेक्षा जास्त असल्यास, दरवर्षी कोलेस्टेरॉल चाचणी करा. (Cholesterol signs on face)

 

बीन्समध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळेच कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

जैंथिलास्मा

ही पिवळ्या रंगाची गाठ आहे, जी हाय कोलेस्टेरॉल दर्शवते. याला झेंथेलास्मा म्हणतात. अशा स्थितीत सहसा खाज सुटते. उच्च कोलेस्ट्रॉल असलेल्या सर्व लोकांमध्ये झँथेलास्माची समस्या उद्भवतेच असं नाही. ही समस्या बहुधा लिपिड प्रोफाइल असमतोल असलेल्या लोकांमध्ये दिसून येते. जेव्हा जेव्हा तुम्हाला पापण्यांवर Xanthelasma दिसेल डॉक्टरांकडे तपासणीसाठी जा.

कॉर्निअल आर्कस

कॉर्नियल आर्कस किंवा आर्कस सेनिलिस ही कॉर्नियाभोवती दिसणारी एक पातळ पांढरी रेषा आहे. यूएस नॅशनल हार्ट, लंग अँड ब्लड इन्स्टिट्यूट (NHLBI) च्या मते, कॉर्नियल आर्कस हे उच्च कोलेस्टेरॉलचे प्रमुख लक्षण आहे. ज्या लोकांचा कौटुंबिक इतिहास उच्च कोलेस्टेरॉल आहे त्यांना कॉर्नियल आर्कस सारखी लक्षणे दिसू शकतात.

इरेप्टिव्ह जैंथोमा

चेहरा, गाल आणि कपाळावर केशरी रंग किंवा डाग हे देखील उच्च कोलेस्ट्रॉलचे लक्षण असू शकते. ते हात, कोपर, नितंब आणि गुडघ्यांवर देखील दिसू शकतात. शरीरावर याची उपस्थिती उच्च पातळीच्या ट्रायग्लिसराइड्सचे संकेत देते.

लिव्हर खराब झाल्याचे संकेत देतात साधी वाटणारी ५ लक्षणं; वेळीच लक्ष द्या अन्यथा.....

सोरायसिस

चेहऱ्याच्या त्वचेवर आणि शरीराच्या इतर भागांवर लाल आणि खाज सुटलेले चट्टे दिसल्यास त्यावर ताबडतोब उपचार करा. कारण हा सोरायसिस आजार आहे. हा रोग उच्च कोलेस्ट्रॉल असलेल्या लोकांमध्ये दिसून येतो. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल