Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > खूप थकवा - सतत चिडचिड होते? हिमोग्लोबिन आणि लोहाची कमतरता असण्याची ५ लक्षणे, दुर्लक्ष जीवावरही बेेतेल..

खूप थकवा - सतत चिडचिड होते? हिमोग्लोबिन आणि लोहाची कमतरता असण्याची ५ लक्षणे, दुर्लक्ष जीवावरही बेेतेल..

Signs of Low Hemoglobin and Iron National Nutrition week 2023: पूर्ण शरीराला ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम हिमोग्लोबिन करत असते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2023 02:51 PM2023-09-03T14:51:52+5:302023-09-04T14:28:29+5:30

Signs of Low Hemoglobin and Iron National Nutrition week 2023: पूर्ण शरीराला ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम हिमोग्लोबिन करत असते.

Signs of Low Hemoglobin and Iron National Nutrition week 2023: Constant fatigue, irritability - do you experience this too? 5 Symptoms of Hemoglobin and Iron Deficiency... | खूप थकवा - सतत चिडचिड होते? हिमोग्लोबिन आणि लोहाची कमतरता असण्याची ५ लक्षणे, दुर्लक्ष जीवावरही बेेतेल..

खूप थकवा - सतत चिडचिड होते? हिमोग्लोबिन आणि लोहाची कमतरता असण्याची ५ लक्षणे, दुर्लक्ष जीवावरही बेेतेल..

महिलांना अनेकदा खूप थकवा आलेला असतो. सततची घरातली कामं, ऑफीस, सणवार, येणारजाणा हे सगळे करुन त्यांना थकवा आला असेल असा आपण अंदाज लावतो. पण हे त्यापुरतेच मर्यादित नसते. तर शरीरात असणाऱ्या विविध प्रकारच्या कमतरता हेही महिलांच्या थकव्याचे, चिडचिडीचे एक महत्त्वाचे कारण असते. महिलांमध्ये साधारणपणे डी व्हिटॅमिन, कॅल्शियम, बी १२ आणि लोह तसेच  हिमोग्लोबिन यांची कमतरता असल्याचे दिसते. लोह हे आपल्या शरीरातले सर्वात महत्त्वाचे खनिज असते. शरीरात लोह आणि हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर बऱ्याच समस्या भेडसावतात. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी शरीराला लोहाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते (Signs of Low Hemoglobin and Iron National Nutrition week 2023). 

लोह आणि हिमोग्लोबिन हे घटक एकमेकांशी कनेक्टेड असल्याने दोघांचे शरीरातील प्रमाण योग्य असणे आवश्यक असते. मात्र हिमोग्लोबिन कमी असेल तर आपल्याला आरोग्याशी निगडीत विविध समस्या उद्भवतात. संपूर्ण शरीराला ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम हिमोग्लोबिन करत असते. मात्र ते न मिळाल्यास सततचा थकवा, चिडचिड, निस्तेजपणा, जीव घाबरल्यासारखे होणे अशा समस्या निर्माण होतात. आपल्या शरीरात कमतरता आहे हे वेळीच लक्षात आलं तर त्यावर उपचार करणे सोपे होते. अन्यथा महिलांना थेट अॅडमिट करायची वेळ येते. असे होऊ नये यासाठी हिमोग्लोबिनच्या कोणत्या लक्षणांकडे विशेष लक्ष द्यायचे याविषयी...

(Image : Google)
(Image : Google)

१. थकवा येणे 

अनेकदा तरुण मुलींना किंवा महिलांना सतत थकवा आल्यासारखे वाटते. काहीच न करता पडून राहावेसे वाटते. अशावेळी इतर कोणतीही लक्षणे नसल्याने काम टाळायचे म्हणून महिला मुद्दाम बहाणे करतात किंवा असे काहीतरी बोलले जाण्याची शक्यता असते. मात्र रक्तातील हिमोग्लोबिन आणि लोहाची पातळी कमी असल्यास बराच थकवा येण्याची शक्यता असते. 

२. श्वास कमी पडणे 

हिमोग्लोबिन कमी झाले की शरीराला ऑक्सिजन पुरवण्याचे काम कमी होते. साहजिकच त्याचा आपल्या श्वसनावर परीणाम होतो आणि दम लागल्यासारखे किंवा श्वास कमी पडल्यासारखे व्हायला लागते. अशावेळी घरातील मंडळी घाबरुन जाण्याची शक्यता असते. मात्र हे हिमोग्लोबिन कमी झाल्याचे लक्षण आहे हे वेळीच ओळखायला हवे.   

(Image : Google)
(Image : Google)

३. चिडचिडेपणा

शरीरात कोणत्या गोष्टींची कमतरता असेल तर चिडचिडेपणा वाढतो. लोह आणि हिमोग्लोबिन कमी असेल तर अशा महिला सतत चिडचिड करतात. बरेचदा या चिडचिडीमागचे कारणही कळत नाही मात्र शरीरातील कमतरता हेच महत्त्वाचे कारण असते हे लक्षात घ्यायला हवे. 

४. त्वचा निस्तेज होणे आणि केस गळणे

अनेकदा आपली त्वचा एकाएकी निस्तेज व्हायला लागते. तसेच केसही मोठ्या प्रमाणात गळायला लागतात आणि पातळ होतात. अशावेळी त्वचा आणि केसांच्या समस्येने सौंदर्यात बाधा येत असल्याने आपण टेन्शनमध्ये येतो. पण रक्तातील हिमोग्लोबिन आणि लोह कमी झाल्यानेच ही समस्या निर्माण झालेली असते हे लक्षात घ्यायला हवे. 

५. घाबरल्यासारखे होणे 

शरीरात लोह कमी असेल तर हिमोग्लोबिनही कमी असण्याचीच शक्यता जास्त असते. अशावेळी हृदयाला श्वास घेण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त कष्ट घ्यावे लागतात. यामुळे हृदयाच्या ठोक्यांची गती वाढते आणि जीव घाबरल्यासारखे होते. हे लक्षण बराच वेळ जाणवत असेल आणि आपण त्याकडे दुर्लक्ष केले तर हृदयावर ताण येतो आणि कार्यात अडथळा निर्माण होतो. 
 

Web Title: Signs of Low Hemoglobin and Iron National Nutrition week 2023: Constant fatigue, irritability - do you experience this too? 5 Symptoms of Hemoglobin and Iron Deficiency...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.