Join us   

रात्री काही केल्या झोपच येत नाही? तज्ज्ञ सांगतात, १ सोपा उपाय - गादीवर पडल्या पडल्या लागेल गाढ झोप...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2023 9:47 AM

Simple and Easy Remedy for Sleep Problem : झोपेची समस्या दूर होण्यासाठी करुन पाहा हा खास उपाय...

रोज चांगली गाढ झोप होणं उत्तम आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. रात्री शांत आणि गाढ झोप झाली तर आपण दिवसभर फ्रेश राहतो. रोज आपल्याला किमान ७ ते ८ तासांची शांत झोप गरजेची असते. पण ही झोप मिळाली नाही तर मात्र दुसऱ्या दिवशी थकवा येणे, अॅसिडीटी, डोकेदुखी, अंगदुखी अशा समस्या उद्भवतात. मग आळस आल्यासारखे होते आणि कामाचा उत्साह राहत नाही. पण रात्री झोपताना हातात असणारा मोबाइलचे, कामाचा ताण, मानसिक तणाव, आरोग्याच्या तक्रारी किंवा अन्य काही कारणांनी आपल्याला रात्री गादीवर पडल्या पडल्या शांत झोप लागत नाही. मग आपण बराच वेळ या कुशीवरुन त्या कुशीवर करत राहतो (Simple and Easy Remedy for Sleep Problem). 

रात्री वेळेत झोप आली नाही की सकाळी लवकर जाग येत नाही. मग पुढच्या दिवसाचे सगळे शेड्यूल बिघडून जाते. पुरेशी झोप झालेली नसल्याने आपण दिवसभर आळसावलेले राहतो आणि जांभया देत राहतो. हे चक्र बराच काळ असेच राहीले तर त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परीणाम होतो. पण असे होऊ नये यासाठी नेमके काय करावे हे मात्र आपल्याला माहित नसते. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ अमिता गद्रे यासाठीच आपल्याला एक सोपा उपाय सांगतात. हा उपाय केल्यास आपल्याला रात्री बेडवर पडल्या पडल्या झोप लागण्यास मदत होते. 

(Image : Google)

काय आहे उपाय? 

रात्री झोपताना अनेकांना कोमट दूध पिण्याची सवय असते. दूध प्यायल्याने शांत झोप येते आणि दुधाने शरीराचे पोषणही होते हेच यामागचे मुख्य कारण असते. लहान मुले तर झोपताना सर्रास दूध पिऊन झोपतात. मात्र तुम्हाला दमणूक झाल्यावरही गाढ झोप येत नसेल तर रात्री दूधाबरोबरच काही गोष्टी आणखी घ्यायला हव्यात. ट्रायप्टोफान आणि मेलाटोनिनची निर्मिती होऊन झोप येण्यासाठी हे पदार्थ फायदेशीर ठरतात.

 

यामध्ये बदाम, आक्रोड, चेरी या गोष्टींचा समावेश करावा. तसेच आपण घेत असलेले दूध हे गाईचे किंवा म्हशीचे असेल याची काळजी घ्यायला हवी. तसेच हा सुकामेवा भिजवून किंवा न भिजवता खाल्ला तरी चालेल. यामध्ये मॅग्नेशियम असल्याने झोप येण्यास याची चांगली मदत होते. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल