शिंका येणं ही सामान्य समस्या आहे. अनेकदा वारंवार सर्दी- शिंका येणं त्रासदायक ठरतं. काहीजणांना सकाळी गरम पाण्यानं अंघोळ करा किंवा थंड पाण्यानं, अंघोळीनंतर खूपच शिंका येतात. (How to stop Sneezing) अशावेळी वारंवार गोळ्या घेतल्यानं तब्येतीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. नाक लाल होणं, नाकात खाज येणं असे त्रास उद्भवतात. वैद्यकीय परीभाषेक याला एलर्जिक रायनायटिस (Allergic Rhinitis) असं म्हणतात. एलर्जिक रायनायटिस एनर्जेनमुळे होणारी एक सामान्य समस्या आहे. (Simple Home Remedies for Sneezing)
याची कारणं धूळ, पाळीव प्राण्यांचा दुर्गंध, पेंट, स्प्रे, मॉईश्चर आणि प्रदूषण यापैकी कोणतीही असू शकतात. अनेकदा वातावरणातील बदलांमुळे या समस्या उद्भवतात. ज्यांना रोज शिंका येतात त्यांना खूपच त्रास होतो. हे चिंताजनक नसून सामान्य आह. रोज सकाळी शिंका येण्याची अनेक कारणं असू शकतात.
शिंका येण्याची कारणं
1) रोज सकाळी शिंका येणं हे एलर्जिक रायनायटिसचं लक्षणं असू शकतं. जेव्हा कोणालाही एलर्जिक रायनायटिकची समस्या असते तेव्हा त्या व्यक्तीला सतत शिंका येतात.
2) जर कोणालाही सायनसची समस्या उसेल तर सकाळी वारंवार शिंका येतात. ही समस्या वाढते तेव्हा शिंका येण्याबरोबरच व्यक्तीच्या चेहऱ्यावर सूज येते, नाक आणि घश्यात जळजळ, डोकेदुखी यांसारख्या समस्या उद्भवतात.
3) जर तुमच्या नाकात कोरडेपणा आला असेल तर सकाळी शिंका येतात. वातावरणातील बदलांमुळे हे उद्भवते. अशा स्थितीत रात्री नाक कोरडे पडते. शिंका येण्याव्यतिरिक्त खोकला, घसा दुखणं, डोकेदुखी, काळी वर्तुळ, थकवा येणं ही लक्षणं जाणवतात.
1) जर तुम्हाला अशा समस्या जाणवत असतील साधं मीठ वापरण्यापेक्षा सैंधव मीठाचा वापर करा. एक चमचा काळी मिरी पावडर, २ ते ३ लवंग दीड चमचा किसलेले आले आणि 10-12 तुळशीची पाने एक कप पाण्यात टाकून मंद आचेवर उकळा. ते अर्धे झाल्यावर प्या. चवीसाठी तुम्ही यात गूळ घालू शकता.
2 मिनिटात चकचकीत, स्वच्छ दिसेल घाण झालेला एग्जॉस्ट फॅन; ४ टिप्स, चिकटपणा होईल दूर
2) सकाळ संध्याकाळ पाणी कोमट करून प्यायल्याने आराम मिळतो. एक कप पाण्यात अर्धा चमचा हळद आणि चिमूटभर खडे मीठ टाकून प्यायल्यानेही आराम मिळतो. हळदीमध्ये असलेले अँटी-एलर्जिक, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म जे बॅक्टेरियांशी लढण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.