खाद्यपदार्थांमध्ये भेसळ किंवा बनावट पद्धतीने बनवल्या जात असल्याच्या बातम्या आपण ऐकल्याच असतील (FSSAI). आपण ज्या किराणा दुकानातून वस्तू खरेदी करतो (Adulteration in Sugar). अगदी मॉलमधील देखील काही वस्तूंमध्ये भेसळ केली जाते. भेसळयुक्त अन्नआरोग्यासाठी घातक मानले जाते. साखर, तूप, मैदा, तांदूळ, दूध, चीज, फळे, भाजीपाला, मसाले आणि कडधान्ये जवळपास प्रत्येक वस्तूमध्ये भेसळ केली जाते.
सध्या सोशल मिडीयावर बनावट साखर बनवण्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात प्लास्टिकपासून साखर बनवण्याचा दावा केला जात आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये जे काही बनवले जात आहे, ते अगदी साखरेसारखे दिसते आहे. ज्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो(Simple test to check adulteration in sugar at home; FSSAI shares 1 easy trick).
टिफिनसाठी मुलांनी पराठा मागितला? टेन्शन घेऊ नका, १० मिनिटांत करा बटाटा पराठा, सारण न करता
एनसीबीआयवर प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, 'भेसळयुक्त अन्नपदार्थ खाल्ल्याने पोटाचे विकार, मधुमेह, हृदयविकार यासारखे गंभीर आणि घातक आजार होऊ शकतात. काही भेसळयुक्त पदार्थांमध्ये कार्सिनोजेनिक घटकही आढळतात. ज्यामुळे शरीरात पौष्टिकतेची कमतरता निर्माण होऊ शकते. त्यामुळे भेसळयुक्त अन्न ओळखून खा.'
साखरेमध्ये अनेक प्रकारची भेसळ होते
प्लास्टिक से बन रही है नकली चीनी 😱 pic.twitter.com/m3lj7M9Ny0
— सनातनी हिन्दू राकेश (मोदी का परिवार) (@Modified_Hindu9) June 25, 2024
फूड सेफ्टी अँड स्टँडर्डस अथॉरीटी ऑफ इंडियानुसार, 'भारतात, विशेषत: साखर आणि गुळाच्या किमती वाढल्या की, साखरेमध्ये भेसळ सर्रास होते. साखरेमध्ये चॉक पावडर आणि पांढरी वाळू मिसळली जाते. ज्यामुळे पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.'
साखरेची भेसळ कशी ओळखावी
- दोन काचेचे ग्लास घ्या. त्यात पाणी भरा.
थंड - गरम खाल्ल्यावर दातांना झिणझिण्या येतात? १० रुपयाच्या तुरटीचा करा 'असा' वापर; ठणक कमी
- दोन्ही ग्लासमध्ये साखर घालून मिक्स करा.
- भेसळ नसलेली साखर पाण्यात चांगली विरघळते.
- भेसळयुक्त साखर पूर्णपणे विरघळणार नाही आणि काही कण पाण्यात तरंगतील.