Join us   

रोज झोपताना ४ गोष्टी करा, कायम कंट्रोलमध्ये राहील शुगर, अचानक शुगर वाढण्याची भितीच नसेल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2023 9:01 AM

Simple ways to control blood sugar level naturally : अनेकांना रात्री झोपण्याआधी मोबाईवर टाईमपास करण्याची सवय असते. ज्यामुळे आरोग्याला धोका उद्भवू शकतो.

डायबिटीसचा आजार  आजकाल तरूणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांमध्येच जाणवतो. टाईप १ डायबिटीस असो किंवा  टाईप २ सतत ब्लड शुगर तपासत राहणं, व्यायाम, डाएट डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात . दिवसरात्र तब्येतीची काळजी घ्यावी लागते. (4 simple bedtime routine for diabetics to control blood sugar )डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी चांगली झोप घेणं गरजेचं आहे.  न्युट्रिशनिस्ट लवनीत बत्रा यांनी काही सोपे उपाय सांगितले आहेत ज्यामुळे रक्तातील सारखेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते. (Simple ways to control blood sugar level naturally) 

भिजवलेले बदाम

रात्री झोपण्याआधी तुम्ही भिजवलेले बदाम खाऊ शकता. यातील मॅग्नेशियम, ट्रिप्टोफॅन झोपेची गुणवत्ता  सुधारण्यात मदत करतात. याशिवाय रात्रीची भूक नियंत्रणात राहते. शुगर क्रेव्हींग्स कमी होतात. 

कॅमोमाईल चहा

जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही झोपण्यापूर्वी 1 कप कॅमोमाइल चहा घेऊ शकता. अँटीऑक्सिडंट गुणधर्मांमुळे, ते रक्तातील साखर नियंत्रित करण्यास उपयुक्त आहे.

१ चमचा भिजवलेले मेथीचे दाणे

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा भिजवलेल्या मेथीचे दाणे चावू शकता. मेथीच्या दाण्यांचे हायपोग्लायसेमिक गुणधर्म रक्तातील साखरेचे नियमन करण्यासाठी आणि झोपेला प्रोत्साहन देण्यासाठी उपयुक्त आहेत.

वज्रासन करा

दिवसभरातील थकवा आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी तुम्ही झोपण्यापूर्वी १५ मिनिटे वज्रासन करू शकता. हे मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यास तसेच रक्त प्रवाह सुधारण्यास मदत करतात.

रात्री मोबाईलवर तासनतास घालवू नका

अनेकांना रात्री झोपण्याआधी मोबाईवर टाईमपास करण्याची सवय असते. ज्यामुळे आरोग्याला धोका उद्भवू शकतो. रात्री किमान ७ तासांची झोप घ्यायला हवी. यामुळे वारंवार तहान लागणं, लघवी येणं, भूक या गोष्टी नियंत्रणात ठेवता येतात. ही लक्षणं कायम दिसत असल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.

टॅग्स : मधुमेहहेल्थ टिप्सआरोग्य