Join us   

जरा गोड खाल्लं की शुगर झरकन ३०० वर पोहोचते? ५ गोष्टी करा, डायबिटीस कंट्रोलमध्ये राहील

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2023 2:19 PM

How to Manage Blood Sugar Spikes After Meals (Diabetes kami karnyache upay) : अनेकजण कामाच्या गडबडीत ही चूक करतात. डायबिटीक रुग्णांनी सकाळी न चुकता नाश्ता करायला हवा.

डायबिटीसच्या (Diabetes) रुग्णांची सगळ्यात मोठी समस्या अशी असते की त्यांची ब्लड शुगर लेव्हल सतत वर-खाली होत असते. पण ब्लड शुगर वाढल्याने धुसर दिसणं, एका ठिकाणी लक्ष केंदीत न होणं,  विचार करण्याची क्षमता कमी होणं, थवा, कमकुवतपणा, मूड स्विंग्स अशी लक्षणं दिसून येतात. (Sugar control kashi karavi)अचानक ब्लड शुगल लेव्हल (Sugar Level) कमी झाली तर चक्कर येऊ शकते. याऊलट रक्तातील साखऱेचं प्रमाण वाढल्यास हार्ट डिसीज, स्ट्रोक, किडनीचे आजार उद्भवू शकतात. म्हणूनच जेवणानंतरची शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी वेळीच काही उपाय करायला हवेत. (How to Control Blood Sugar Spikes After Meals)

जेवणाआधी आणि नंतर ब्लड शुगर किती असावी? (After eating diabetes range)

जेवल्यानंतर अनेक रुग्णांमध्ये ब्लड शुगर ३०० वर पोहोचते. अमेरिकन डायबिटीस असोशियेशननुसार जेवणाच्या आधी फिंगर स्टिकने शुगर तपासा. नंतर जेवल्यानंतर १ ते २ तासांनी पुन्हा चेक करा. हा  क्रम जवळपास एक आठवडाभर सुरू ठेवा. यामुळे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात येण्यास मदत होईल.  जेवणाच्या १ ते २ तासानंतर ब्लड शुगर लेव्हल १८० मिलीग्राम/डिएलपेक्षा कमी असायला हवी. (Simple Ways to Prevent Blood Sugar Spikes after Meals)

हिवाळ्यात करा पौष्टीक मेथीचे लाडू; खास रेसिपी-लाडू जराही कडू होणार नाही, हाडं होतील बळकट

काय खाताय याकडे लक्ष द्या

तुम्ही मिठाई, व्हाईट ब्रेड, भात, पास्ता किंवा बटाट्यासारख्या पदार्थांचे सेवन करत असाल तर जेवल्यानंतर तुमची ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते. म्हणून  आपल्या आहारात कमीत कमी गोड पदार्थांचा समावेश करा. 

अन्हेल्दी फॅट्सपासून दूर राहा

तुम्ही ज्या प्रकारच्या पदार्थांचे सेवन करता त्यामुळे ब्लड शुगर लेव्हल वाढण्याचा धोका असतो. म्हणूनच तुम्ही जास्त तेल, तूपयुक्त खाद्यपदार्थ न खाता ऑलिव्ह ऑईलमध्ये शिजवलेलं जेवण खा. या पद्धतीने ब्लड शुगर वाढणं रोखता येऊ शकतं.

डायबिटिस कंट्रोलसाठी सद्गुरू नाश्त्याला खातात 'हा' पदार्थ; तुम्हीही खा-कधीच वाढणार नाही डायबिटीस

रोज सकाळी न चुकता नाश्ता करा

अनेकजण कामाच्या गडबडीत नाश्ता न करण्याची चूक करतात. डायबिटीक रुग्णांनी सकाळी न चुकता नाश्ता करायला हवा. सकाळी उठल्यानंतर २ तासांच्या आत काहीना काही खायला हवं. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणानंतर ब्लड शुगर लेव्हल वाढण्याची शक्यता असते. अशावेळी हेल्दी पदार्थांचा आहारात समावेश करा. 

डायबिटीसच्या रुग्णांनी नाश्त्याला काय खावं (Breakfast For Diabetes Control)

नाश्ता साधा असेल तरी प्रोटीन्सयुक्त पदार्थ  असावेत. जर्नल न्युट्रिशनवर प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार नाश्त्याला कमी कॅलरीज आणि प्रोटीन्स युक्त पदार्थांचे सेवन केल्यास ब्लड शुगर लेव्हल कमी होण्यास मदत होते. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यमधुमेह