Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Rare Sensory Hearing Loss अलका याज्ञिकना अचानक ऐकू येणं झालं बंद, हा आजार नेमका काय? कशाने होतो?

Rare Sensory Hearing Loss अलका याज्ञिकना अचानक ऐकू येणं झालं बंद, हा आजार नेमका काय? कशाने होतो?

Singer Alka Yagnik diagnosed Rare Sensory Hearing Loss: गायिका अलका याज्ञिक यांनी स्वत:च सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांना झालेल्या आजाराची माहिती दिली आहे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2024 04:48 PM2024-06-18T16:48:16+5:302024-06-19T16:21:52+5:30

Singer Alka Yagnik diagnosed Rare Sensory Hearing Loss: गायिका अलका याज्ञिक यांनी स्वत:च सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांना झालेल्या आजाराची माहिती दिली आहे...

singer alka yagnik is suffering from Rare sensory neural nerve hearing loss, what are the symptoms and causes of Rare sensory neural nerve hearing loss | Rare Sensory Hearing Loss अलका याज्ञिकना अचानक ऐकू येणं झालं बंद, हा आजार नेमका काय? कशाने होतो?

Rare Sensory Hearing Loss अलका याज्ञिकना अचानक ऐकू येणं झालं बंद, हा आजार नेमका काय? कशाने होतो?

Highlightsत्यांच्या चाहत्यांना हा एक प्रकारचा धक्काच असून हा आजार नेमका आहे तरी काय, तो कशामुळे होतो, त्याची नेमकी लक्षणं काय असे अनेक प्रश्न अनेकांना पडले आहेत.

परदेसी परदेसी, चोली के पिछे क्या है... यासारख्या गाण्यांच्या माध्यमातून घरांघरांत पोहोचलेला आणि अतिशय लोकप्रिय झालेला आवाज म्हणजे अलका याज्ञिक. अलकाजींच्या सुरांमधलं माधुर्य ऐकणाऱ्यांना मंत्रमुग्ध करणारं आहे. त्यांचं गाणं ऐकून ऐकून अनेक कान तयार झाले. पण आज मात्र त्या स्वत:च कानासंबंधी असणाऱ्या एका आजाराने त्रस्त आहेत. त्यांनी स्वत:च इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या आजाराविषयी माहिती दिली. त्यांच्या चाहत्यांना हा एक प्रकारचा धक्काच असून हा आजार नेमका आहे तरी काय, तो कशामुळे होतो, त्याची नेमकी लक्षणं काय असे अनेक प्रश्न अनेकांना पडले आहेत. (singer alka yagnik is suffering from Rare sensory neural nerve hearing loss)

 

अलका याज्ञिक यांना कोणता आजार झाला?

सोशल मिडियाच्या माध्यमातून माहिती देताना अलका याज्ञिक यांनी सांगितलं की त्यांना Rare sensory neural nervehearing loss नावाचा कानाशी संबंधित आजार झाला आहे.

वटसावित्री पौर्णिमा: खूप वेळ न घालवता झटपट सुंदर मेकअप करण्याच्या ५ टिप्स, सगळ्यांपेक्षा देखण्या दिसाल

 

काही दिवसांपुर्वी त्या विमानप्रवास संपवून विमानातून खाली उतरल्या. त्यानंतर काही वेळात त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांची ऐकण्याची क्षमता खूपच कमी झालेली आहे. असं का झालं असावं हे त्यांना बराच वेळ लक्षात आलं नाही. त्यानंतर तपासणी केल्यानंतर त्यांना या आजाराविषयी माहिती मिळाली. अजूनही मी खूप डिस्टर्ब असून माझ्यासाठी प्रार्थना करा, असं त्यांनी चाहत्यांना सांगितलं आहे. एनडीटीव्ही डॉट कॉम यांनी दिलेल्या वृत्तानुसार या आजारात सुरुवातीला काही रुग्णांना ऐकू येणं खूप कमी होतं आणि कालांतराने त्यांना ऐकू येणं पुर्णपणे बंद होऊ शकतं. कानामध्ये असणाऱ्या काही पेशींना इजा झाल्यामुळे हा त्रास होतो. 

 

Rare sensory neural nervehearing loss होण्याची कारणं

१. बऱ्याचदा वाढत्या वयामुळे कानातल्या पेशी कमजोर झाल्याने हा आजार होतो.

तळहात चेहऱ्यावर जोरात घासून मॉईश्चरायझर लावता? चाळिशीनंतरही तरुण दिसायचं तर बघा योग्य पद्धत...

२. कानावर किंवा डोक्यावर जोरात मार लागला तरीही हा आजार होऊ शकतो.

३. व्हायरल ॲटॅक झाल्यामुळेही Rare sensory neural nervehearing loss होऊ शकतो.

 

Rare sensory neural nervehearing loss ची लक्षणं

१. आपल्याला एका कानाने जरा कमी ऐकायला येत आहे, असं जाणवायला लागणं.

चांदबाली झुमक्यांनी खुलवा सौंदर्य! वटपौर्णिमेनिमित्त करा खास खरेदी- बघा चांदबालींचे ३ सुंदर प्रकार

२. एका कानाच्या तुलनेत दुसऱ्या कानाने चांगलं ऐकू येणं.

३. कानातून कायम एक बारीक आवाज येत राहाणं. 
 

Web Title: singer alka yagnik is suffering from Rare sensory neural nerve hearing loss, what are the symptoms and causes of Rare sensory neural nerve hearing loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.