Join us   

प्रियांचा चोप्राचा दिर केविन जोनासला झाला त्वचेचा कर्करोग, लक्षणं कोणती, कशाने होतो हा आजार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2024 1:33 PM

Kevin Jonas Suffer From Skin Cancer: अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पती निक जोनास याचा भाऊ  म्हणजेच प्रसिद्ध गायक केविन जोनास याला नुकताच त्वचेचा कर्करोग झाल्याचे निदर्शनास आले आहे. (what are the symptoms of basal cell carcinoma)

ठळक मुद्दे त्या तिळामध्येच कॅन्सरच्या काही पेशी असल्याचं तपासणीदरम्यान डॉक्टरांना आढळून आलं. त्यामुळे शस्त्रक्रिया करून त्या पेशी काढून टाकण्यात आल्या.

कर्करोगाचे प्रमाण हल्ली जगभरच खूप जास्त वाढले आहे. सर्वसामान्य लाेकांप्रमाणेच अनेक सेलिब्रिटीही कर्करोगाच्या विळख्यात आल्याचं आपण नेहमीच ऐकतो. या आजारातून पुर्णपणे बरं होणं आता शक्य असलं तरी सुरुवातीला हा आजार झाल्याचं लक्षात येताच प्रत्येकाला धडकी भरतेच. आता नुकतंच प्रसिद्ध हॉलीवूड गायक केविन जोनास याला त्वचेचा कॅन्सर झाल्याचं निदान झालं असून त्याच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे (Kevin Jonas Suffer From Skin Cancer). त्याच्या चेहऱ्यावर असणारा एक लहानसा तीळ कर्करोगाचं लक्षण सांगणारा होता. त्यावरून डॉक्टरांना त्याच्या या आजाराविषयीची कल्पना आली. याविषयीचा व्हिडिओ केविनने स्वत:च इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.(what are the symptoms of basal cell carcinoma)

 

केविन जो त्वचेचा कर्करोग झाला आहे तो बेसल सेल कार्सिनोमा म्हणून ओळखला जातो. केविनच्या कपाळावर एक थोडा मोठ्या आकाराचा तीळ होता. त्या तिळामध्येच कॅन्सरच्या काही पेशी असल्याचं तपासणीदरम्यान डॉक्टरांना आढळून आलं. त्यामुळे शस्त्रक्रिया करून त्या पेशी काढून टाकण्यात आल्या.

केमिकल्स असणारं विकतचं मेयोनिज खाण्यापेक्षा १० मिनिटांत घरीच तयार करा भरपूर प्रोटीन्स देणारं मेयोनिज

आपल्या त्वचेचा जो सगळ्यात वरचा भाग आहे त्याच्या अगदी खालच्या भागात बेसल सेल असतात. त्वचेवर नव्या पेशी तयार करण्याचं काम बेसल सेल करतात आणि ते पारदर्शी असतात. जे लोक खूप जास्त वेळ उन्हात असतात त्यांना हा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते असं तज्ज्ञ सांगतात. 

 

बेसल सेल कार्सिनोमाची लक्षणं कोणती?

त्वचेवर एखादा लालसर, गुलाबी किंवा त्वचेच्याच रंगाचा मोठा फुगवटा येतो. कपाळ, नाक, खालचा ओठ, गाल, मान, कान या भागात तो प्रामुख्याने आढळून येतो. बऱ्याचा त्वचेवर फुगवटा येण्याऐवजी तो एखाद्या रॅशप्रमाणे दिसतो.

मुलं खूपच चंचल आहेत- अभ्यासालाही शांतपणे बसत नाहीत? तज्ज्ञ सांगतात ३ उपाय- एकाग्रताही वाढेल 

ज्याला खूप खाज सुद्धा येते. कधी कधी तो भाग कोरडा होऊन त्यावर पापुद्रा आल्यासारखं दिसतं. जखम झाल्याप्रमाणे वाटतं. बऱ्याचदा त्यातून रक्तही येतं. असं काही आढळून आल्यास ते बेसल सेल कार्सिनोमाचं एक लक्षण असू शकतं. या आजारावर इलाज करून त्यातून पुर्णपणे बाहेर येणं शक्य आहे. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सप्रियंका चोप्रानिक जोनास