उन्हामुळे शरीराची लाही लाही होते (Skin Care Tips). शरीरातून घामाच्या धारा निघतात. घामामुळे शरीर चिपचिपित होते. मुख्य म्हणजे चालताना मांड्या एकमेकांना घासल्या जातात (Thighs Skin Care). साधारणपणे जेव्हा बायका साडी नेसतात किंवा ज्यांच्या शरीरावर मास जास्त आहे त्यांना या समस्येचा सामना करावा लागतो. इनर थाईसवर येणारे रॅशेज आणि जळजळ खूपच त्रासदायक ठरू शकतात. ज्यामुळे चालणं अवघड होतं.
जीन्स किंवा कोणतीही पॅण्ट घातली असेल तर असा त्रास होत नाही. पण साडीमध्ये किंवा स्कर्टमध्ये याची समस्या अधिक छळते. मांड्यांच्या घर्षणामुळे त्वचेच्या समस्या होऊ नये म्हणून ४ गोष्टींची मदत घ्या(Skin chafing on thighs? Things to prevent and heal this painful condition).
एलोवेरा जेल
एलोवेरा जेल त्वचेसाठी फायदेशीर ठरते. आपण याचा वापर सनबर्नवर उपचार करण्यासाठी करू शकता. एलोवेरा जेलमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. ज्यामुळे त्वचा रिकव्हर होते. आपण याचा थेट वापर मांड्यांवर करू शकता. यामुळे लाल झालेली स्किन आणि रॅशेज कमी होतील.
ऐन तारुण्यात हाडं कडकड वाजतात? कॅल्शियम शरीराला आवश्यक? हाडांची झीज होऊ नये म्हणून...
नारळाचं तेल
नारळ तेलामध्ये अँटी इन्फेमेटरी गुणधर्म असतात, जे त्वचेला शितलता प्रदान करतात. जर मांडी एकमेकांना घासली गेली असेल तर, खोबरेल तेलाचा वापर करा. मांडीच्या सभोवतालच्या भागात हे तेल लावल्याने घासण्याची समस्या कमी होईल, आणि चालताना त्रास होणार नाही.
कडूलिंबाचा वापर
कडूलिंबाचा वापर आपण स्किनसाठी करू शकता. यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. जे त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असतात. यासाठी भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्यात कडूलिंबाची पानं घाला. तयार पाणी मांड्यांना लावा. काही वेळानंतर धुवा. यामुळे लाल झालेली स्किन आणि रॅशेज कमी होतील.
दुपारी जेवण झालं की खूप झोप येते? रिसर्च सांगते दुपारची झोप घेतल्याने वजन वाढतं की..?
हळद
हळदीचा वापर फक्त स्वयंपाकासाठी नसून, स्किनसाठीही फायदेशीर ठरते. त्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. ज्यामुळे जखम बरी होते. जर मांड्या एकमेकांना घासल्या असतील तर, आणि त्यामुळे मांड्यांवर रॅशेज आल्या असतील तर, हळदीचा वापर करा. यासाठी पाण्यात हळद घालून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट मांड्यांवर लावा. फरक दिसेल.